US F1 Visa: अमेरिकेच्या एफ-१ व्हिसासाठी भरावं लागणारं सेविस शुल्क काय असतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 10:32 PM2021-10-02T22:32:07+5:302021-10-02T22:37:00+5:30
सेविस शुल्क व्हिसा अर्ज शुल्कापेक्षा (डीएस-१६० शुल्क) किंवा यूएस आणि इमिग्रेशन सेवा (यूएससीआयएस) म्हणून भरलेल्या शुल्कापेक्षा वेगळं असतं.
प्रश्न- मी विद्यार्थी असून अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी एफ१ व्हिसासाठी अर्ज केला आहे. मुलाखतीदरम्यान माझ्याकडे 'सेविस शुल्क' भरल्याची पावती विचारण्यात आली. सेविस शुल्क म्हणजे काय? व्हिसा अर्जाच्या शुल्कावेळी भरलेलं शुल्क आणि सेविस शुल्क सारखंच असतं का?
उत्तर- अमेरिकेत विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळावा म्हणून जेव्हा तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता, त्यावेळी तुम्हाला आय-९०१ स्टुडंट आणि एक्स्चेंज व्हिसिटर इन्फोर्मेशन सिस्टिम (सेविस) शुल्क भरावं लागतं. सेविस शुल्क व्हिसा अर्ज शुल्कापेक्षा (डीएस-१६० शुल्क) किंवा यूएस आणि इमिग्रेशन सेवा (यूएससीआयएस) म्हणून भरलेल्या शुल्कापेक्षा वेगळं असतं.
सर्व नॉनइमिग्रंट विद्यार्थी आणि एक्स्चेंज व्हिसिजर्संना आय-९०१ सेविस शुल्क भरावं लागतं. या शुल्कातून स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर प्रोगॅम (एसईव्हीपी) आणि सेविसचा खर्च निघतो. सेविससंबंधित प्रशिक्षण देणाऱ्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सेविसशी निगडित समस्या सोडवणाऱ्या एसईव्हीपी क्षेत्र प्रतिनिधींचा खर्च सेविस शुल्कातून निघतो. शाळा अचूक आणि योग्य माहितीची वेळेवर नोंद करतात की नाही याची नोंद यातून ठेवली जाते. स्टुडंट स्टेटस कायम राखण्यास अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिका सोडण्यास किंवा पुन्हा अर्ज करण्यास सांगितलं जातं.
एफ-१ किंवा जे-१ स्टेटसच्या अखंडित कालावधीत एकदाच हे शुल्क आकारलं जातं. आय-२० किंवा डीएस-२०१९ अर्ज जारी झाल्यावर आणि एफ-१ किंवा जे-१ व्हिसाच्या मुलाखतीला जाण्यापूर्वी, तुम्ही सेविस शुल्क भरायला हवं. शुल्क भरण्यासाठी किंवा याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी www.fmjfee.com ला भेट द्या.
सेविस शुल्क परत केलं जात नाही. तुमचा व्हिसा अर्ज नाकारला गेल्यानंतरही शुल्क परत दिलं जात नाही. तुम्हाला व्हिसा नाकारला गेल्यास आणि तुम्ही त्याच कार्यक्रमाच्या अंतर्गत पुन्हा एफ-१ किंवा जे-१ व्हिसासाठी १२ महिन्यांच्या आत अर्ज केल्यास, तुम्हाला पुन्हा सेविस शुल्क भरावं लागणार नाही.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.
फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.