वर्षभराहून जास्त काळ परदेशात असलेल्या ग्रीन कार्डधारकानं अमेरिकेत कसं परतावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:00 PM2020-06-27T12:00:08+5:302020-06-27T12:01:11+5:30

कायदेशीर कायमस्वरुपी सदस्यांनी (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्डधारकांनी ३६५ दिवसांत किंवा रि-एंट्री परवाना वैध असेपर्यंत अमेरिकेत परतावं या नियमांत कोणताही बदल झालेला नाही.

what should green card holder do to return america after staying abroad for more than a year  | वर्षभराहून जास्त काळ परदेशात असलेल्या ग्रीन कार्डधारकानं अमेरिकेत कसं परतावं?

वर्षभराहून जास्त काळ परदेशात असलेल्या ग्रीन कार्डधारकानं अमेरिकेत कसं परतावं?

Next

प्रश्न- मी अमेरिकेचा कायदेशीर कायमस्वरुपी नागरिक आहे. माझं ग्रीन कार्ड अद्याप वैध आहे. पण मी गेल्या वर्षभराहून जास्त काळ अमेरिकेत राहतोय. माझ्याकडे रि-एंट्री परवाना नाही. मला अमेरिकेला परत जाता आलं नाही. मी काय करावं?

उत्तर- कायदेशीर कायमस्वरुपी सदस्यांनी (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्डधारकांनी ३६५ दिवसांत किंवा रि-एंट्री परवाना वैध असेपर्यंत अमेरिकेत परतावं या नियमांत कोणताही बदल झालेला नाही. या कालावधीत न परतलेल्या कायदेशीर कायमस्वरुपी नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी नवा इमिग्रंट व्हिसा लागतो. सध्याच्या नियमांनुसार कायदेशीर कायमस्वरुपी नागरिकांना रि-एंट्री परवान्यासाठी अर्ज करता येत नाही. हा परवाना तुम्ही अमेरिका सोडून परदेशी जाण्याआधीच घ्यावा लागतो.

व्हिसासाठी मुलाखत सुरू झाल्यावर तुम्ही रिटर्निंग रेसिडंट (एसबी-१) इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करू शकता. ही दोन टप्प्यांमधील प्रक्रिया आहे. तुम्ही अमेरिकेला नागरिक म्हणून परत जाण्यास पात्र आहेत, याची खातरजमा पहिल्या मुलाखतीमधून होते. या मुलाखतीसाठी तुमचं कायमस्वरुपी नागरिक ओळखपत्र, पूर्ण भरलेला डीएस-११७ अर्ज आणि उपलब्ध असल्यास तुमचा रि-एंट्री परवाना आवश्यक असतो. तुमचा अमेरिकेला परतण्याचा हेतू स्पष्ट करणारी आणि तुम्ही अमेरिकेला परतू न शकलात याचे पुरावे दाखवणारी कागदपत्रंदेखील दाखवू शकता.

तुम्ही अमेरिका सोडताना कायदेशीर कायमस्वरूपी नागरिक होतात आणि तुम्ही अमेरिकेला परतण्याच्या हेतूनं प्रयत्न केलात, मात्र तो हेतू पूर्णत्वास जाऊ शकला नाही, हे तुम्हाला पटवून द्यावं लागतं. तुमचा परदेशातील मुक्काम तात्पुरत्या स्वरूपाचा होता आणि त्यामागील कारण तुमच्या नियंत्रणाबाहेरचं होतं. त्यामुळे त्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत, हे तुम्हाला पटवून द्यावं लागतं.

अमेरिकेत परतण्यासाठीचा अर्ज दूतावासातील अधिकाऱ्यानं स्विकारल्यास तुम्हाला दिलेल्या तारखेला व्हिसा मुलाखतीसाठी जावं लागेल. मुलाखतीआधी वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. यासोबत तुम्हाला इमिग्रंट व्हिसा आणि एलियन रजिस्ट्रेशन अर्जदेखील (डीएस-२६० अर्ज) भरावा लागेल. तुमच्या पहिल्या मुलाखतीवेळी, दूतावासातील अधिकारी तुम्हाला व्हिसा मुलाखतीवेळी आवश्यक असलेल्या नागरी कागदपत्रांची माहिती देईल. मात्र त्याला मान्यता मिळेल याची खात्री नाही.

नेहमीच्या व्हिसासंबंधी कामासाठी दूतावास सध्या बंद आहे. दूतावासातील कामकाज केव्हा सुरू होईल, याची माहिती आम्ही आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देऊ. याबद्दल तुम्हाला अधिक काही प्रश्न असल्यास support-india@ustraveldocs.com वर ईमेल करा.
 

Web Title: what should green card holder do to return america after staying abroad for more than a year 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.