अमेरिकेचं ग्रीन कार्ड असताना कोरोनामुळे वर्षभरापेक्षा अधिक काळ भारतात अडकला असल्यास काय करावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 10:31 PM2021-05-01T22:31:40+5:302021-05-01T22:33:34+5:30
कोरोना संकटामुळे अनेक ग्रीन कार्डधारक भारतात अडकले आहेत. त्यांनी काय करावं?
प्रश्न- माझ्याकडे अमेरिकेचं ग्रीन कार्ड असून मी कोरोना संकटामुळे वर्षभराहून अधिक काळ भारतात अडकलोय. मी काय करावं?
उत्तर: आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे अमेरिकेचे ग्रीन कार्डधारक जगभरात अडकले आहेत. तुम्हाला अमेरिकेत परतून पुन्हा अमेरिकेचं कायमचं नागरिक व्हायचं असल्यास, तुम्हाला रिटर्निंग रेसिडंट (एसबी-१) इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होते.
टप्पा १: रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी अर्ज करा.
http://www.ustraveldocs.com/in वर जाऊन दूतावासाकडून ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्या. दूतावासासमोर हजर राहताना तुमच्याकडे योग्य कागदपत्रं असायला हवीत. तुम्हाला रिटर्निंग अर्जाचं शुल्क (१८० डॉलर) भरावं लागेल. त्यानंतर डीएस-११७ अर्ज भरा. मुलाखतीसाठी येताना तुमच्यासोबत सर्व सहाय्यक कागदपत्रं घेऊन जा. दूतावासातील अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून तुम्ही रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी पात्र आहात की नाही ते ठरवेल. यासाठी पात्र असल्यास तुम्ही इमिग्रंट व्हिसासाठीदेखील पात्र ठरता. यानंतर तुम्ही रिटर्निंग रेसिडंटसाठी (एसबी-१) अर्ज करू शकता.
टप्पा २: एसबी-१ इमिग्रंट व्हिसासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटची वेळ घ्या
रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्ही http://www.ustraveldocs.com/in वर जाऊन एसबी-१ इमिग्रंट व्हिसाच्या अंतर्गत ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊ शकता.
या मुलाखतीला जाताना तुम्ही खालील कागदपत्रं घेऊन या:
१. रिटर्निंग रेडिडंट व्हिसासाठी तुम्ही शुल्क (२०५ डॉलर) भरायला हवं.
२. https://ceac.state.gov/ceac वर जाऊन डीएस-२६० अर्ज भरा आणि मुलाखतीला जाताना कन्फर्मेशन पेजची प्रिंट आऊट घेऊन या.
३. पासपोर्टची मूळ प्रत घेऊन या.
४. तुमचे दोन फोटो घेऊन या.
५. स्थानिक पासपोर्ट कार्यालयातून पोलिसांचं मंजुरी प्रमाणपत्र घेऊन या.
६. मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी पूर्ण करा. या डॉक्टरांची यादी https://in.usembassy.gov/visas/immigrant-visas/ वर उपलब्ध आहे.
७. यासोबतच आवश्यक असलेली इतर कागदपत्रं घेऊन या.
रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठीचा अर्ज, फॉर्म डीएस-११७ आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केल्यावर दूतावासातील कर्मचारी तुम्ही रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी पात्र ठरता की नाही ते ठरवतो. तुम्ही येत असलेल्या देशात तुमचं निवासस्थान आहे का या आधारावर तम्हाला नॉनइमिग्रंट व्हिसा मिळणार की नाही ते ठरतं. तुम्हाला पुरेसे पुरावे सादर करता न आल्यास तुम्हाला सारख्याच आधारावर सारख्याच श्रेणीत इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करावा लागू शकतो.