एलियन्सनी संपर्क साधला तर काय उत्तर द्यावे?; शास्त्रज्ञ, नीतिकार उत्तर शोधण्यात गर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 09:20 AM2022-11-09T09:20:03+5:302022-11-09T09:20:23+5:30
जवळजवळ एक शतकापासून शास्त्रज्ञ पृथ्वीबाहेरील जिवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु अद्याप त्यांना यश आलेले नाही
लंडन :
जवळजवळ एक शतकापासून शास्त्रज्ञ पृथ्वीबाहेरील जिवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु अद्याप त्यांना यश आलेले नाही, पण जर यश आले किंवा परग्रहवासीयांनी (एलियन) संपर्क साधला तर ? आपली प्रतिक्रिया काय असावी हे आज कोणीही सांगू शकत नाही. कारण, आपण ही कल्पनाच केलेली नाही. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी आता परग्रहवासीयांशी संपर्काच्या घटनेसाठी तयारी सुरू केली आहे.
पृथ्वीबाहेरील जग व तेथून येणाऱ्या कथित उडत्या तबकड्यांबाबत शास्त्रज्ञ गंभीर असून, ते यावर संशोधन करत आहेत. ते अनेक वर्षांपासून परग्रहावरील जिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अद्याप त्यांना यश आले नाही, पण जर उद्या परग्रहवासीयांकडून आम्हाला संदेश आला तर आम्ही त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न विचारल्यावर याचे उत्तर येईल आम्हाला माहीत नाही आणि हे स्वाभाविकही आहे. कारण आपण कधी याची कल्पना केलेली नाही.
संशोधकांच्या मते ही खरोखरच एक समस्या आहे. कारण, परग्रहवासियांच्या संदेशावर किंवा त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी हे आम्हाला ठाऊक नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ३५ वर्षांत प्रथमच नीतिकार आणि शास्त्रज्ञ एकत्र येऊन संपूर्ण जगासाठी एलियन कॉन्टॅक्ट प्रोटोकॉल (परग्रहवासीयांसोबतच्या संपर्काविळचा शिष्टाचार अर्थात अशावेळी कसा प्रतिसाद द्यावा याची पद्धत) तयार करत आहेत. यासाठी स्कॉटलँडमधील सेंट अॅण्ड्रयूज विद्यापीठाने सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल इंटेलिजन्स (सेटी) पोस्ट डिटेक्शन हबची स्थापना संशोधकांच्या मते, ही खरोखरच केली असून, संगणक शास्त्रज्ञ एक समस्या आहे. कारण, जॉन एलियट हे या केंद्राचे परग्रहवासीयांच्या संदेशावर किंवा समन्वयक आहेत.
एलियन कॉन्टॅक्ट प्रोटोकॉल येणार
हे केंद्र एलियन कॉन्टॅक्ट प्रोटोकॉल तयार करणार आहे. नवा संशोधन गट परग्रहवासीयांच्या संपर्कामुळे मानवावर होणाऱ्या परिणामांबाबत संशोधन करेल. मात्र, या केंद्राचा मुख्य भर परग्रहवासीयांनी संपर्क केला तर आम्ही कशी प्रतिक्रिया द्यावी हे निश्चित करण्यावर असेल.
'त्या' सिग्नलचा अर्थ लावणार...
"परग्रहवासीयांशी संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, नवीन सेटी डिटेक्शन हब परग्रहवासीयांनी पाठवलेल्या संभाव्य संदेशांच्या संकेतांचे निरीक्षण करेल व त्या सिग्नलचा अर्थ लावण्यासाठी एक चौकट तयार करेल. आम्हाला परग्रहवासीयांकडून कधी संदेश मिळेल का? आम्हाला माहीत नाही. मात्र, त्यासाठी तयार राहायला हवे, असे डॉ. इलियट म्हणाले.