Squirrel Attack: हा कशाचा बदला! खारुताईने ४८ तासांत केला १८ जणांवर हल्ला; नाईलाजाने मारावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:01 PM2021-12-29T15:01:59+5:302021-12-29T15:02:35+5:30
Squirrel Attack: बीडनंतर आता ब्रिटनमध्ये प्रकार...! गार्डनमध्ये येणाऱ्या काही लोकांवरच हल्ला केला. जाणून घ्या कारण...
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बीडमध्ये माकडांनी कुत्र्यांची पिल्ले पळवून ती उंचीवरून सोडून देत मारत असल्याचा प्रकार समोर आला होता. तसाच प्रकार ब्रिटनच्या फ्लिंटशायर (UK, Flintshire) मध्ये घडला आहे. गार्डनमध्ये फिरण्यासाठी, खेळण्यासाठी येणाऱ्या वृद्ध, मुलांवर खारुताईने (Squirrel) हल्ला केला आहे. हातावर, बोटांवर चावून, नखे मारून जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.
या हल्ल्यांच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली. या हैदोस घालणाऱ्या खारीला पकडण्यासाठी ४८ तासांची मेहनत घेतली गेली. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार डझनावर लोकांच्या हातावर जखमा, खरचटल्याचे निशान आहेत. लोकांनी या खारीचे नाव 'स्ट्राइप' (Stripe) असे ठेवले आहे. 'द ग्रेमलिन्स' (The Gremlins) फिल्ममध्ये व्हिलनचे पात्र आहे. या खारीला मंगळवारी, २८ डिसेंबरला पकडण्यात आले. ६५ वर्षीय कोरीन रेनॉल्डस (Corrine Reynolds) यांनी एका जाळ्याच्या मदतीने या खारीला पकडले. या खारीला RSPCA या संस्थेकडे सोपविण्यात आले.
रिसायक्लिंग बॅग कचऱ्याच्या डब्यात टाकणाऱ्या लोकांना या खारीने लक्ष्य केल्याचे सांगण्यात आले आहे. RSPCA कडे खार सोपविल्यावर मोठा पेच निर्माण झाला. कारण ही खार वेगळ्या प्रजातीची असल्याने तिला नियमानुसार जंगलात सोडता येत नाही. यामुळे तिला मारण्याच्या निर्णय घेण्यात आला. लाला खार असती तर तिला जंगलात सोडता आले असते. मात्र, ही ग्रे म्हणजे पांढऱ्या-काळ्या रंगाची होती. ही खार लोकांच्या अंगावर उड्या मारून त्यांचे हात, मान आदी ठिकाणी चावा घेत होती.