पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:34 IST2025-03-19T08:25:03+5:302025-03-19T08:34:54+5:30

Sunita Williams First Reaction: नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीवर परतले आहेत.

What was Sunita Williams first reaction after landing on earth picture viral | पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पाहा VIDEO

पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पाहा VIDEO

Sunita Williams Return:नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले आहेत. नासाच्या क्रू-९ अंतराळवीर मिशनचा भाग असलेले चौघेजण मंगळवारी ५:५७ वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे  दोन्ही अंतराळवीर नऊ महिन्यांपूर्वी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी २८६ दिवसांनी पृथ्वीवर उतरल्यानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले आहेत. ८ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे दोघेही ९ महिन्यांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. त्यानंतर २८६ दिवसांनी निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासह स्पेस एक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलवर पृथ्वीवर दाखल झाले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी फ्लोरिडा पॅनहँडलजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरून पृथ्वीवर परतले. यावेळी त्यांना पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण जाणवले.

सुनीता विल्यम्स यांनी स्पेस एक्स क्रू ९ ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर हात हलवत सगळ्यांना अभिवादन केलं आणि हसल्या. कॅप्सूलमधून बाहेर पडताना विल्यम्स यांनी हात हलवत आणि थंब दाखवला. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच या अंतराळवीरांना ४५ दिवस रिहॅबिलेटेशनसाठी पाठवण्यात येणार आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर अंतराळवीरांच्या सुरक्षित परतण्यावर नासाने भविष्यातील मोहिमांसाठी एक मोठा धडा शिकायला मिळाला अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर नासाने या मोहिमेतील आव्हाने आणि स्पेस एक्सच्या सहकार्याची माहिती दिली.
 

Web Title: What was Sunita Williams first reaction after landing on earth picture viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.