आम्हाला जुन्या टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेत जाता येईल का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 01:29 PM2017-08-08T13:29:36+5:302017-08-08T13:41:42+5:30
आम्हाला पुढच्यावर्षी सुट्टीमध्ये फिरण्यासाठी मियामीला जायचे असेल तर, आम्हाला नवीन टुरिस्ट व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल का ?
मुंबई, दि. 8 - मागच्या महिन्यात माझ्या कुटुंबाला टुरिस्ट व्हिसा मिळाला, पण काही इर्मजन्सी आल्यामुळे आता आम्हाला प्रवास करता येणार नाही. आम्हाला पुढच्यावर्षी सुट्टीमध्ये फिरण्यासाठी मियामीला जायचे असेल तर, आम्हाला नवीन टुरिस्ट व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल का ?
तुमच्या चालू टुरिस्ट व्हिसाची मुदत संपत नाही तोपर्यंत तुमच्या कुटुंबाला नवीन व्हिसासाठी अर्ज करायची आवश्यकता नाही. टुरिजम व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी अमेरिकेत जायचे असेल तर, व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.
B1/B2 टुरिस्ट व्हिसा दहावर्षांसाठी वैध असतो. या व्हिसावर तुम्ही कितीही वेळा अमेरिकेत जाऊ शकता. पर्यटन आणि बिझनेस ट्रॅव्हलचे वेगवेगळे प्रकार असून, B1/B2 व्हिसा अंतर्गत तुम्ही अमेरिकावारी करु शकता. उदहारणार्थ कुटुंबाला भेटणे, परिषदेला जाणे आणि औषध उपचारांसाठी या व्हिसातंर्गत तुम्ही अमेरिकेला जाऊ शकता.
प्रत्येकवेळी तुम्ही अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर कस्टम आणि सीमा सुरक्षा अधिकारी तुम्हाला किती दिवसांची परवानगी मिळाली आहे त्याची खातरजमा करेल.
तुम्ही अमेरिकेला जाण्याची योजना बनवत असाल आणि अमेरिकेत जाण्याआधी तुमच्या व्हिसाची मुदत संपत असेल तर, तुम्ही नव्या व्हिसासाठी अर्ज करा. नवीन व्हिसासाठी अर्ज करताना चालू व्हिसाची मुदत संपेपर्यंत तुम्हाला थांबण्याची गरज नाही हे लक्षात घ्या.