पासपोर्टवरील नाव बदलल्यावर काय कराल?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:59 PM2018-11-14T17:59:20+5:302018-11-14T17:59:42+5:30
प्रश्न- मला नुकताच नवा पासपोर्ट मिळाला आहे, मात्र त्यावरचे नाव जुन्या पासपोर्टवरील नावाशी जुळत नाही. माझ्या जुन्या पासपोर्टवर अमेरिकेचा मुदत न संपलेला वैध व्हिसा आहे. मी त्या रद्द झालेल्या पासपोर्टवरील व्हिसा वापरुन अमेरिकेचा प्रवास करु शकतो का?
प्रश्न- मला नुकताच नवा पासपोर्ट मिळाला आहे, मात्र त्यावरचे नाव जुन्या पासपोर्टवरील नावाशी जुळत नाही. माझ्या जुन्या पासपोर्टवर अमेरिकेचा मुदत न संपलेला वैध व्हिसा आहे. मी त्या रद्द झालेल्या पासपोर्टवरील व्हिसा वापरुन अमेरिकेचा प्रवास करु शकतो का?
उत्तर- वैयक्तीक आणि सांस्कृतिक कारणांमुळे नावांमध्ये बदल होतो हे आम्ही जाणून आहोत. तुम्ही रद्द झालेल्या पासपोर्टच्या मदतीने प्रवास करु शकता मात्र तुमच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासाच्यावेळे, तुम्हाला नवा पासपोर्ट आणि एक अधिकचे ओळखपत्र बाळगावे लागेल. काही आंतरराष्ट्रीय विमानवाहिन्या तुमच्या ओळखीबाबत शंका आल्यास तुम्हाला प्रवास नाकारू शकतात. त्यामुळे अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट तुम्ही नव्या पासपोर्टवर नवा व्हिसा मिळवून प्रवास करावा असे सुचवते. जर तुमच्या नावामध्ये लहानसे बदल (अनिलकुमारचे अनिल कुमार किंवा पुजाचे पूजा) पासपोर्टमध्ये झाले असतील तर तुम्ही दोन्ही पासपोर्ट आणि ओळखीचा पुरावा घेऊन प्रवास करू शकता. कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन एजंटसना दाखवण्यासाठी तुम्हाला या ओळखपत्राचे इंग्रजीतील भाषांतर केलेली वैध प्रत असावी. व्हीसा दिलेली व्यक्ती आपणच आहोत हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. जर नावामध्ये विवाह, घटस्फोट, न्यायालयीन आदेशानुसार नावात बदल झाल्यावर नवा पासपोर्ट घेतलाच पाहिजे. अमेरिकेच्या व्हीसासाठी आवश्यक असणारी कायदेशीर कागदपत्रे, ओळखपत्रे, घटस्फोटाचा निकाल, लग्नाचे नोंदणीपत्र, जुन्या पासपोर्ट यांच्यासह नवा पासपोर्ट तुम्हाला प्रवास करता येऊ शकेल. अमेरिकेचा व्हीसा आणि तुम्ही सादर करत असलेला पासपोर्ट यांच्यावरील नावे जुळणे तुमच्या प्रवासासाठी सोपेच जाईल. तुम्हाला अमेरिकेत प्रवेश देण्याचा अधिकार पूर्णपणे कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन एजंटकडे असेल मात्र सर्व आवश्यक कागदपत्रे बाळगल्यामुळे तुमची स्थिती समजणे त्यांना सोपे जाईल.