Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:10 PM2023-02-13T12:10:57+5:302023-02-13T12:22:54+5:30

तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारी रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत हजारो जणांनी आपला जीव गमावला आहे, जगभरातून अनेक देशांनी तुर्कस्तानसाठी मदत पाठवली.

Whats App saved lives! A student who was buried under the rubble in Turkey survived | Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला

Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला

googlenewsNext

तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारी रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत हजारो जणांनी आपला जीव गमावला आहे, जगभरातून अनेक देशांनी तुर्कस्तानसाठी मदत पाठवली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान, एका ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आले आहे, त्याचा जीव Whats App मुळे वाचला असल्याचे बोलले जात आहे. 

व्हॉट्सअॅपचा वापर सगळीकडे संवादासाठी केला जातो. आता तुर्कस्तानमध्ये व्हॉट्सअॅपमुळे एका विद्यार्थ्याचा जीव वाचल्याचे प्रकरण समोर आले आहे. पूर्व तुर्कीमध्ये बोरान कुबात नावाचा विद्यार्थी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकला . यानंतर व्हॉट्सअॅपची मदत घेत त्याने व्हिडीओ सेव्ह करून स्टेटसमध्ये शेअर केले आणि त्याचे लोकेशनही शेअर केले. 

पहिल्या धक्क्याने विद्यार्थी आणि त्याची आई बचावले पण ते आपल्या इमारतीकडे जात असताना दुसऱ्या धक्क्याने इमारत कोसळली. मात्र, त्यांचा जीव वाचला. यानंतर बोरान कुबत याने तिथून एक हिडीओ बनवून तो स्टेटस टाकून शेअर केला.

यात त्याने एक मेसेजही लिहिला होता. 'मदत करा'. या व्हिडिओमुळे बचाव पथकाला त्याला शोधणे सोपे झाले आणि त्याचा जीव वाचला. ढिगाऱ्यात अडकल्यानंतर त्याला आठवले की तो व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून आपले आणि आईचे प्राण वाचवण्याचे आवाहन करू शकतो.

यावेळी या विद्यार्थ्याने व्हॉट्सअॅपवर त्याचे लोकेशनही शेअर केले. त्यामुळे त्याला आणि त्याच्या आईला शोधण्यात बचाव पथकाला खूप मदत झाली. पण, कुटुंबातील इतर सदस्यही ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे त्याने सांगितले, त्यासाठी बचाव पथक सातत्याने काम करत आहे. तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांनी तुर्कस्तानला मदतीची घोषणा करून आपली टीम तिथे पाठवली आहे.

Web Title: Whats App saved lives! A student who was buried under the rubble in Turkey survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.