चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले लीक, अशा गोष्टी आल्या समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:04 PM2021-06-17T14:04:23+5:302021-06-17T14:12:45+5:30

Boris Johnson Whatsapp chat leak: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

The WhatsApp chat of the Prime Minister of Britain Boris Johnson is leaked, such things came to light ... | चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले लीक, अशा गोष्टी आल्या समोर...

चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले लीक, अशा गोष्टी आल्या समोर...

googlenewsNext

लंडन - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ( Boris Johnson ) यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे चॅट बोरिस जॉन्सन यांचे माजी वरिष्ठ सल्लागार डोमिनिक कमिन्स यांनी लीक केले आहे. या चॅटमध्ये बोरिस जॉन्सन आरोग्य सचिव मॅट हेनकॉक यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. तर कमिन्स यांनी त्यांच्या एका प्रदीर्घ ब्लॉग पोस्टमधून मॅट हेनकॉक कोरोना काळातील अपयशाबाबत खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. (The WhatsApp chat of the Prime Minister of Britain Boris Johnson is leaked)

कमिंग्स यांनी एका व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. कमिंग्स यांच्या म्हणण्यानुसार हा स्क्रिनशॉट गतवर्षीच्या २६ मार्च रोजीचा आहे. यामध्ये कमिंग्स आणि बोरिस जॉन्सन यूकेच्या कोविड टेस्टिंग क्षमतेबाबत बोलत होते. या चॅटदरम्यान बोरिस जॉन्सन हे खूप निराश झालेले दिसत होते. तसेच आरोग्य सचिव मॅटकडून काही अपेक्षा ठेवता येत नाही, असे म्हणत होते.

याशिवाय गतवर्षीच्या २७ एप्रिलच्या चॅटदरम्यान, बोरिस जॉन्सन म्हणाले की,  पीपीई किट्सची जबाबदारी मॅट हेनकॉक यांच्याकडून काढून घेतली पाहिजे. त्यांच्याऐवजी ही जबाबदारी कॅबिनेट ऑफीस मिनिस्टर मायकल गोव यांना दिली पाहिजे.

दरम्यान, या चॅटच्या आधारावर कमिंग्स यांनी बोरिस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले की, मॅट हेनकॉक कोरोनाकाळात चाचणी, पीपीई किट्स आणि होमकेअरच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच स्वत: पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र असे असूनही बोरिस यांनी मॅट यांना पदावरून हटवले नाही. त्यांच्या बेफिकीरीमुळे यूकेमधील अनेक लोकांचा बळी गेला.

हे चॅट्स समोर आल्यानंतर विरोधी पक्षाचे जस्टिस मेडर्स यांनी बोरिस जॉन्सन यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, या चॅटमुळे हे स्पष्ट होते की,सत्ताधारी पक्ष लॉकडाऊन आणि पीपीई किट्सबाबत बेफिकीर राहिला. त्यामुळे आम्ही अनेक लोकांना गमावले. मॅट यांचं काम वाईट होतं असं स्वत: पंतप्रधानांना वाटत होतं तर त्यांना जगातील सर्वात मोठ्या साथीदरम्यान पदावरून का हटवलं नाही, हेच मला कळत नाही. बोरिस जॉन्सन आणि मॅट हेनकॉक यांनी या बाबत उत्तर देण्याची गरज आहे.  

Web Title: The WhatsApp chat of the Prime Minister of Britain Boris Johnson is leaked, such things came to light ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.