जेव्हा ४०४ आइनस्टाइन एकत्र चालतात

By admin | Published: April 2, 2017 12:53 AM2017-04-02T00:53:33+5:302017-04-02T00:53:33+5:30

कॅनडाच्या या शहरातील प्रमुख रस्त्यावर मंगळवारी वेगळेच दृश्य होते. हा रस्ता शेकडो लोकांनी ओसंडून वहात होता. यातील ४०४ लोक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट

When 404 Einstein runs together | जेव्हा ४०४ आइनस्टाइन एकत्र चालतात

जेव्हा ४०४ आइनस्टाइन एकत्र चालतात

Next

टोरँटो : कॅनडाच्या या शहरातील प्रमुख रस्त्यावर मंगळवारी वेगळेच दृश्य होते. हा रस्ता शेकडो लोकांनी ओसंडून वहात होता. यातील ४०४ लोक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यासारखे दिसत होते. होय, या सर्वांचा पोषाख, पांढरे कुरळे केस, दाढी आणि मिशीही आईनस्टाईन यांच्यासारखीच होती.
सर्वाधिक संख्येने आइनस्टाइनसारखे दिसण्याचा गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी आइनस्टाइनसारखे रुप धारण केले होते. यापूर्वी ९९ लोकांनी आइनस्टाइन यांच्यासारखी वेशभूषा करून विक्रम केला होता. तो मोडण्यासाठी टोरँटोत ४०४ लोक आइनस्टाइन बनले.
हे सर्व जण शहरात काही दिवसांनी होणाऱ्या आइनस्टाइन स्पर्धेत भाग घेणार आहेत. यात स्पर्धक नवा शोध लावण्याबाबत आपली कल्पना मांडतात. यशस्वी स्पर्धकाला
आपल्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी
बक्षीस म्हणून दहा हजार डॉलर दिले
जातात.

Web Title: When 404 Einstein runs together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.