अमेरिकेसाठी विद्यार्थी व्हिसा कधी मिळतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:18 PM2022-06-19T12:18:12+5:302022-06-19T12:18:44+5:30
व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कुठे शिकायचे आहे, त्याचा निर्णय सर्वप्रथम घ्यावा लागेल तसेच, त्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळायला हवा. आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त एक्रिडिटेड संस्था आणि विद्यापीठ असून, संपूर्ण शैक्षणिक खर्चाच्या शिष्यवृत्तीची सोय तसेच संशोधनाची संधीदेखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
प्रश्न - मला अमेरिकेमध्ये उच्चशिक्षण घेण्यात रस आहे. परंतु, मी अद्याप शैक्षणिक संस्थेची निवड केलेली नाही, तरीदेखील मला विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करता येईल का?
उत्तर - व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कुठे शिकायचे आहे, त्याचा निर्णय सर्वप्रथम घ्यावा लागेल तसेच, त्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळायला हवा. आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त एक्रिडिटेड संस्था आणि विद्यापीठ असून, संपूर्ण शैक्षणिक खर्चाच्या शिष्यवृत्तीची सोय तसेच संशोधनाची संधीदेखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यासंदर्भात उत्तम माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणजे, एज्युकेशन यूएसए. विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट नेटवर्क ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट’ची केंद्रे १७५ पेक्षा जास्त देशांतून उपलब्ध आहेत. भारतामध्ये एज्युकेशन युएसएची आठ केंद्र असून तेथून या संदर्भात बहुमोल माहिती उपलब्ध होऊ शकते. तुमच्या जवळचे केंद्र https://educationusa.state.gov/ find-advising-center येथे शोधता येईल. किंवा, USE ducation Queries@state.gov येथे थेट ई मेल करून माहिती प्राप्त करून घेता येईल. भारतातील विद्यार्थ्यांना एज्युकेशन यूएसएच्या https://educationusa. state.gov या वेबसाईटवरदेखील माहिती मिळू शकेल. तसेच, एज्युकेशन यूएसए इंडियाच्या ॲपवरूनदेखील माहिती मिळू शकेल.
एज्युकेशन यूएसएवरून मिळणारी बहुतांश माहिती ही मोफत आहे. या माध्यमातून प्रवेश अर्ज, प्रक्रिया, धोरण, शैक्षणिक खर्च, जाण्यापूर्वीचा परिचय कार्यक्रम अशा विषयांवर विशेष सेमिनार, कार्यशाळा आदींचे आयोजन वर्षभर सुरू असते. शैक्षणिक साहाय्य आदी मुद्यांसह अनेक सामायिक प्रश्नांची उत्तरे येथील अनुभवी सल्लागारांकडून मिळू शकतात.
एकदा तुम्ही शैक्षणिक संस्था निवडून तेथे प्रवेशासाठी अर्ज केला आणि तो अर्ज स्वीकारला गेला की, संबंधित शैक्षणिक संस्था तुम्हाला आय-२० नावाचा फॉर्म पाठविते. (आय-२०: नॉन इमिग्रंट विद्यार्थ्यांचे पात्रता प्रमाणपत्र) तुम्हाला आय-२० फॉर्म मिळाला याचा अर्थ कायदेशीररित्या अमेरिकेतील शिक्षणासाठी तुमची नोंदणी झालेली आहे. एकदा तुम्हाला आय-२० मिळाला की, तुम्ही मुंबईतील कौन्सुलेट जनरलकडे अमेरिकेतील शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करू शकता.
किंवा, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई या चारपैकी एका व्हिसा प्रक्रिया केंद्रात अर्ज करू शकता. पुन्हा एकदा महत्त्वाचे असे की, जोपर्यंत अमेरिकेतील शैक्षणिक संस्था तुम्हाला प्रवेश मंजूर करत नाही आणि जोवर तुम्हाला आय-२० फॉर्म मिळत नाही, तोवर कृपया विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करू नये.
विद्यार्थी व्हिसासाठी अतिरिक्त गोष्टींची संपूर्ण यादी तसेच व्हिसा अर्जाची प्रक्रिया आदी माहितीसाठी तुम्ही आमच्या www.ustraveldocs.com वेबसाईटला भेट देऊ शकता.
महत्त्वाची सूचना
व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.