संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानची तीन देश कोंडी करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 09:06 AM2017-09-23T09:06:51+5:302017-09-23T09:10:43+5:30

दहशतवादी अड्डयांना पोसायचे आणि नंतर आम्हीच कसे दहशतवादाचे बळी आहोत याची टिमकी वाजवायची ही पाकिस्ताची नेहमीची नीती. मात्र भारतीय उपखंडातील तीन महत्त्वाच्या देशांनी म्हणजे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी यूएनच्या आमसभेत पाकिस्तानची यावरुन चांगलीच कोंडी केली.

When Pakistan's three countries dump in the United Nations General Assembly ... | संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानची तीन देश कोंडी करतात तेव्हा...

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानची तीन देश कोंडी करतात तेव्हा...

Next

संयुक्त राष्ट्रे, दि.23- दहशतवादी अड्डयांना पोसायचे आणि नंतर आम्हीच कसे दहशतवादाचे बळी आहोत याची टिमकी वाजवायची ही पाकिस्ताची नेहमीची नीती. मात्र भारतीय उपखंडातील तीन महत्त्वाच्या देशांनी म्हणजे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी यूएनच्या आमसभेत पाकिस्तानची यावरुन चांगलीच कोंडी केली. पाकिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादाच्या केंद्रांवरुन जगाचे लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान रडगाणी गात असल्याचा आरोप करुन या तिन्ही देशांनी पाकिस्तानच्या दुतोंडी भूमिकेवर बोट ठेवले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांनी अफगाणिस्तानमधील दहशतवादी कृत्ये, यादवी तसेच परकीय शक्तींचा हस्तक्षेप याचा पाकिस्तानलाही त्रास होतो, आमचेही नागरिक अमेरिकेने २००१ पासून सैन्य पाठवल्यानंतर मेले असा सूर लावला. आपल्या देशातील दहशतवादावर बोलण्याएेवजी अफगाणिस्तानकडे लक्ष वळवणा-या अब्बासी यांचा अफगाणिस्तानने विनाविलंब खरपूस समाचार घेतला. अफगाणिस्तानने राईट टू रिप्लायचा वापर करताना अफगाणिस्तानच्या यूएनमधील प्रतिनिधीने पाकिस्तानचा खरा चेहरा काही क्षणांमध्ये सर्वांच्या समोर आणला. "स्वतःच्या देशातील दहशतवादाच्या पोषणकेंद्रांवरुन लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान आमचा उल्लेख करत आहे. पाकिस्तानातील दहशतवादाला मिळणा-या सरकारी व बिनसरकारी पाठिंब्यामुळेच अफगाणिस्तानातील दहशतवादाला खतपाणी मिळते हो सगळ्या जगाला माहिती आहे." असे सांगत या प्रतिनिधीने म्हटले चला दहशतवादाचे खरे चित्र स्पष्ट होण्यासाठी चला काही प्रश्न विचारू -

अल कायदाचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन कोठे मारला गेला?
उत्तर आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद

तालिबानचा नेता मुल्ला ओमर कोठे मेला? 
कराचीतील रुग्णालयात 

मुल्ला अख्तर मन्सूर कोठे सापडला आणि मारला गेला ?

उत्तर आहे पाकिस्तानातील बलुचिस्तानात

आणि त्याच्याकडे कोणत्या देशाचा पासपोर्ट होता सांगा पाहू ? पाकिस्तान 

अफगाणिस्तानात येणारा प्रत्येक दहशतवादी घटक आणि जगाने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या २० संघटनांचे दहशतवादी अफगाणिस्तानात कोणत्या देशातून येतात? उत्तर आहे पाकिस्तान

अशा प्रकारे अत्यंत नाट्यमयरित्या पाकिस्तानचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणत अफगाणिस्तानचा प्रतिनिधी पुढे म्हणाला, "अफगाणिस्तानातील कथित यादवी आणि परकीय हस्तक्षेपाच्या कितीतरी आधी पाकिस्तानात राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी हिंसक संघटनांचा वापर केला जातो. इतकेच नव्हे तर ३१ मे रोजी काबूलमध्ये स्फोट घडवणारे पाकिस्तानात आले असल्याची शक्यता पाकिस्तानचे आदरणीय पंतप्रधान अब्बासी यांनी नुकतीच वर्तवली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांना आमचा पाठिंबा असल्याचा आरोप आम्ही फेटाळून लावतो, ही समोर ठेवलेली तथ्यंच सर्व काही सांगतात". अशा शब्दांमध्ये अफगाणिस्तानने यूएनमध्ये पाकिस्तानवर 'हल्ला' चढवला.

अफगाणिस्तानप्रमाणे भारतानेही राईट टू रिप्लायचा वापर करत अब्बासी यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान हे टेररिस्तान बनले आहे असा थेट उल्लेख करत भारतीय प्रतिनिधीने अत्यंत शांतपणे पाकिस्तानचे ढोंग उघड केले. पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांचा उल्लेख करत काश्मीर भारताचा अविभाज्य अंग असून भविष्यातही ते आमचेच राहिल असा स्पष्ट संदेश दिला. इतकेच नव्हे तर पाकिस्तान हे एक अपयशी राष्ट्र असून भारताला लोकशाही मूल्ये मानवाधिकार याबाबत पाकिस्तानने शिकवण्याची गरज नाही असा सल्लाही भारताने दिला. 
इकडे रोहिंग्यांचा प्रश्न आणि दहशतवादावर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी १९७१ साली पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानात केलेल्या हिंसाचाराचा उल्लेख करुन पाक लष्कराचा क्रूर चेहरा सर्वांच्या समोर आणला.  १९७१ साली मार्च महिन्यात पाकिस्तानच्या लष्कराने तत्कालिन पूर्व पाकिस्तानात अत्यंत घृणास्पद असे आँपरेशन सर्च लाईटद्वारे ३० लाख लोकांची कत्तल करुन वंशच्छेदास सुरुवात केली अशा स्पष्ट शब्दांमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी पाकिस्तानवर शाब्दिक तोफ डागली. 
पाकिस्तान लष्कराने केलेल्या या हिंसक वंशच्छेदात २ लाख महिलांवर अत्याचार व बुद्धिजिवींची हत्या केल्याचेही वाजेद यांनी स्पष्ट सांगितले २५ मार्च १९७१ पासून सुरु झालेला लढा नऊ महिने चालला होता. २५ मार्चला 'जेनोसाइड डे '  जाहीर करण्याचा निर्णय नुकताच बांगलादेशच्या संसदेने घेतल्याचे वाजेद म्हणाल्या.पाकिस्तानतर्फे करण्यात येणार्या विविध विधानांचा  कडाडून विरोध करुन पाकिस्तानचे दावे वाजेद यांनी खोडून काढले. 
 

Web Title: When Pakistan's three countries dump in the United Nations General Assembly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.