जगातील सर्वात पहिले चुंबन कधी घेतले? कोपनहेगन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी समोर आणले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:22 AM2023-05-25T07:22:02+5:302023-05-25T07:23:40+5:30
मानवांमधील ‘रोमँटिक चुंबना’चा सर्वात जुना पुरावा शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला असून, सुमारे इ.स.पू. २५०० च्या प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.
कोपनहेगन : शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुने पुरावा असलेले चुंबन सुमारे ४५०० वर्षांपूर्वीचे आहे, असा दावा कोपनहेगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. मानवांमधील ‘रोमँटिक चुंबना’चा सर्वात जुना पुरावा शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला असून, सुमारे इ.स.पू. २५०० च्या प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.
संशोधकांनी सांगितले की, प्रथम रेकॉर्ड केलेले रोमँटिक चुंबन मध्य पूर्वमध्ये सुमारे ४,५०० वर्षांपूर्वीचे होते. सुमारे १००० वर्षांपूर्वी ऐतिहासिक भारतीय ग्रंथांमध्येही याचे वर्णन करण्यात आले. मेसोपोटेमियामध्ये सापडलेल्या मातीच्या गोळ्यांचा अभ्यास केल्यानंतर डॅनिश शास्त्रज्ञांनी हा शोध लावला. हे लैंगिक खेळाचे गोळे कांस्य युगातील आहेत.
चुंबनाचे वर्णन सुमेरियन आणि अक्कडियन भाषेतील सर्वात जुन्या दस्तऐवजांमध्ये आढळले. मेसोपोटेमियात दोन्ही भाषा बोलल्या जात होत्या. या भाषेतील लेखनाचा उगम इराकमध्ये इ.स.पू. ३२०० मध्ये झाला असे मानले जाते. मेसोपोटेमिया विद्यापीठातील वैद्यकीय इतिहासातील तज्ज्ञ डॉ. ट्रोल्स पंक अर्बोल म्हणाले की, प्राचीन मेसोपोटेमियातील लोक मातीच्या गोळ्यांवर क्यूनिफॉर्म लिपीमध्ये लिहीत असत. प्राचीन काळात चुंबन हा रोमँटिक जवळीकीचा भाग कसा मानला जात होता, याचे ते स्पष्ट उदाहरण आहेत.
तेव्हाही होती संसर्गची भीती
संशोधन अहवालानुसार, त्या काळातही मानवाने असा अंदाज लावला होता की, चुंबनाने अनेक प्रकारचे संक्रमण किंवा विषाणू पसरू शकतात. त्या काळातील अनेक ग्रंथांमध्ये बुबुतु किंवा बुशानु यांसारख्या रोगांचा उल्लेख आहे. हे रोग आज नागीण म्हणून ओळखले जातात.
चुंबन होते दैनंदिन जीवनाचा एक भाग
nसंशोधनातून असे दिसून आले आहे की, ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकाच्या अखेरीस लैंगिक संबंध, कौटुंबिक आणि मैत्रीच्या संबंधांमध्ये चुंबन हा दैनंदिन जीवनाचा एक सामान्य भाग होता. कदाचित ती एका प्रदेशाची खासियत नसून जगभर पसरलेली असावी.
nडॉ. ट्रोल म्हणतात की, त्यामुळे चुंबन ही प्रथा मानली जाऊ नये, जी एका विशिष्ट प्रदेशात निर्माण आणि तेथून संपूर्ण जगात पसरली.