Sunita Williams : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? नासाने तारीखच सांगितली; दोनवेळा तांत्रिक अडचण आली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:19 AM2024-06-27T11:19:06+5:302024-06-27T11:20:35+5:30

Sunita Williams : सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना परत येण्यास काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. याबाबत आता नासाने एक मोठी अपडेट दिली आहे.

When will Sunita Williams return to earth? NASA just announced the date | Sunita Williams : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? नासाने तारीखच सांगितली; दोनवेळा तांत्रिक अडचण आली

Sunita Williams : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? नासाने तारीखच सांगितली; दोनवेळा तांत्रिक अडचण आली

Sunita Williams : सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या, पण आता त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दोनवेळा त्यांच्या स्टारलाइनर अंतराळयानात अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, आता याबाबत नासाने मोठी अपडेट दिली आहे. नासाने त्यांच्या परतीची तारीख जाहीर केली आहे. बोइंग स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अंतराळयान अंतराळात अडकले आहे.

सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना घेऊन बोईंगच्या स्टारलाइनरने ५ जून रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले आणि ६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या पोहोचले. तांत्रिक बिघाडामुळे विमान अजूनही स्थानकातच अडकले आहे. नासाने सीआयडी रिटर्न्सचे तीन वेळा शेड्यूल केले होते.

Chandrayaan-4 : चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन

नासाने दिली अपडेट

स्पेस सेंटरमधून सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांच्या परतण्याची तारीख जाहीर केली आहे. नासा क्रू मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले की, स्टारलाइनर ४५ दिवसांपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर डॉक केले जाऊ शकते. सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांच्या पृथ्वीवर परतण्याची तारीख ६ जुलै निश्चित करण्यात आली आहे. याआधी नासाने पृथ्वीवर उतरण्याची तारीख दोनदा पुढे ढकलली आहे. याआधी १५ जून होती, त्यानंतर २३ जूनलाही तांत्रिक अडचणी आल्या.

NASA आणि बोईंगच्या मॅनेजमेंट टीम डेटाचे परीक्षण करत आहे. ६ जून रोजी स्टारलाइनर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरल्यानंतर ५ हेलियम लीक आणि ५ थ्रस्टर्सने काम करणे थांबवले असल्याचे आढळले. या अडचणींवर सध्या काम सुरू आहे.

Web Title: When will Sunita Williams return to earth? NASA just announced the date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.