जेथे 500 अणुचाचण्या झाल्या!
By admin | Published: March 1, 2017 04:38 AM2017-03-01T04:38:09+5:302017-03-01T04:38:09+5:30
कझाकिस्तानच्या ‘द पॉलिगन’चा इतिहास भयंकर आहे
अस्ताना : कझाकिस्तानच्या ‘द पॉलिगन’चा इतिहास भयंकर आहे. १९४९ ते १९८९ यादरम्यान येथे दरवर्षी सरासरी १० अणुचाचण्या घेण्यात आल्या. आता त्यांचे दुष्परिणाम दिसत आहेत. शीतयुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाने अणुचाचणीसाठी येथे सर्वात मोठे केंद्र उभारले होते. सोव्हिएतने येथे ४५६ अणुबॉम्बची चाचणी घेतली. ‘द पॉगिलन’ म्हणून हे स्थळ ओळखले जाते. कुअरशाटोफ हे येथील मुख्य शहर आहे. रशियन भौतिकशास्त्रज्ञ आयगोर कुअरशाटोफ यांच्या कार्याचा गौरव म्हणून या शहराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. कुअरशाटोफ यांनी सोव्हिएतच्या अणुकार्यक्रमाचे नेतृत्व केले होते. सर्बियाच्या तुलनेत हा भाग मेक्सिकोच्या जवळ असल्यामुळे त्याची अणुचाचण्यांसाठी निवड करण्यात आली. या भागात लोक राहत नव्हते. येथील जमीनही गरजेपेक्षा अधिक कडक आहे. त्यामुळेच रशियन शासक निकोलसने (प्रथम) १८५४ मध्ये सरकारविरुद्ध बोलणारे लेखक फ्योदोर दोस्तोवस्की यांना निर्वासित करून या भागात आणून सोडले होते. ही जागा निर्मनुष्य होती, असे सांगण्यात येत असले तरी १९४७ मध्ये येथे ७० हजार लोक राहत होते. त्यात कारिप्बेक कुयुकोव यांचाही समावेश आहे. ते रशियन अणुचाचण्यांचा परिणाम भोगत आहेत. ‘माझा जन्म झाला तेव्हा मला हात नव्हते. माझ्या आईला धक्काच बसला होता. आई मला तीन दिवस पाहूही शकली नव्हती. १९६८ मध्ये माझा जन्म झाला होता. तुम्हाला हे बाळ नको असेल तर मी त्याला (बाळाला) असे इंजेक्शन देऊ शकतो ज्यामुळे तुमचा आणि त्याचा त्रास दूर होईल, असे डॉक्टरने आईला सांगितले.
>अणुचाचणीनंतर येथे आरोग्याची समस्या निर्माण झाली. नवनवे रोग उत्पन्न होऊ लागले. कॅन्सर साथरोगासारखा पसरला. काही लोकांनी तर आपले कुटुंबीय आणि मुलांसह आत्महत्या केली.