अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास कुठे होतात अंत्यसंस्कार? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:09 PM2021-10-01T17:09:12+5:302021-10-01T17:09:12+5:30

Astronaut Dead Body: पृथ्वीवर जर कुठल्याही माणसाचा मृत्यू झाल्यास मृतदेह वाया जाऊ नये म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र जर अवकाशात कुणाचा मृत्यू झाल्यास त्या मृतदेहाचं काय केलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडतो.

Where do funerals take place if an astronaut dies in space? Learn what the process is | अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास कुठे होतात अंत्यसंस्कार? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास कुठे होतात अंत्यसंस्कार? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

Next

वॉशिंग्टन - पृथ्वीवर जर कुठल्याही माणसाचा मृत्यू झाल्यास मृतदेह वाया जाऊ नये म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र जर अवकाशात कुणाचा मृत्यू झाल्यास त्या मृतदेहाचं काय केलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर देताना नासाचे अंतराळवीर टेरी विर्ट्स यांनी सांगितले की, कुठल्याही अंतराळवीरासाठी अंतराळात मृत्यू होण्यासारखं वाईट काही नसतं. (Where do funerals take place if an astronaut dies in space? Learn what the process is)

अंतराळ यानामध्ये मृतदेहाला स्टोअर करण्याची कुठलीही सुविधा नसते. तसेच अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर आणण्यासाठी मिशन संपण्याची वाट पाहणेही शक्य नसते. अशा परिस्थितीत मृतदेह एअरलॉकमध्ये पॅक करून अवकाशात सोडला जातो. त्यानंतर हा मृतदेह अंतराळातील थंडीमुळे आईस ममीमध्ये परिवर्तीत होतो. 

ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा नासाच्या अपोलो मिशन दरम्यान, तयार करण्यात आलेल्या स्पेस सूटची चाचणी घेण्यात आली. यामधून हेही समोर आले की, स्पेसमधील दबावामुळे मृतदेहामध्ये स्फोटही होऊ शकतो. अंतराळामध्ये मृतदेह जर कुठल्याही वस्तूवर आदळून नष्ट झाला नाही तर तो अनिश्चितकाळापर्यंत अंतराळात राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते हा मृतदेह शेकडो लाखो वर्षांपर्यंत अंतराळाच्या अनंकात उपस्थित राहू शकतो.

अंतराळवीरांनी सांगितले की, अंतराळ मोहिमेवर गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह पृथ्वीवर परत आणण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. त्यामुळे अंतराळात कुठल्याही अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी अनेक उपाय योजले जाऊ शकतात. यामध्ये मृतदेहाला अंतराळात सोडणे, मंगळ ग्रहावर दफन करणे आदी उपायांचा समावेश आहे. मात्र मंगळग्रहावरील माती खराब होऊ नये म्हणून आधी मृतदेह जाळावा लागेल. मात्र हे काम खूप किचकट आहे. त्याबाबत संशोधन सुरू आहे. मात्र अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळविराचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पृथ्वीवर आणता येईल, याबाबत कुठलीही निश्चितता नाही आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार अंतराळात आतापर्यंत केवळ तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक स्वीडिश कंपनी प्रोसेमा अंतराळ शवपेटी तयार करत आहे. ही शवपेटी मृत अंतराळवीराच्या मृतदेहाला बर्फाच्या क्रिस्टलच्या फ्रिज ड्राय टॅबलेटमध्ये सुरक्षित ठेवेल. कॅनडाचे अंतराळवीर क्रिस हेडफिल्ड सांगतात की, मी अपेक्षा करतो की, मंगळ ग्रहावर अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास आपण त्याचा मृतदेह पृथ्वीवर आणण्याऐवजी तिथेच दफन करण्याबाबत विचार केला पाहिजे. 

Web Title: Where do funerals take place if an astronaut dies in space? Learn what the process is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.