कोरोनाचा जन्म नेमका कुठं झाला? तपासणीसाठी  WHO चे पथक चीनला जाणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:45 PM2020-07-08T19:45:06+5:302020-07-08T19:55:57+5:30

चीनमधील वुहान या शहरातून कोरोना जगभर पसरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोनाचे मूळ हे चीन असून चीनमध्येच कोरोनाचा जन्म झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.

Where exactly was Corona born? WHO will go to China for investigation | कोरोनाचा जन्म नेमका कुठं झाला? तपासणीसाठी  WHO चे पथक चीनला जाणार  

कोरोनाचा जन्म नेमका कुठं झाला? तपासणीसाठी  WHO चे पथक चीनला जाणार  

googlenewsNext
ठळक मुद्देचीनमधील वुहान या शहरातून कोरोना जगभर पसरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोनाचे मूळ हे चीन असून चीनमध्येच कोरोनाचा जन्म झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. जगभरात कोरोनाचा फैलाव अद्यापही मोठ्या प्रमाणात होत असून गेल्या २४ तासांत भारतात २२ हजार ७५२ कोरोना रुग्णांची नोंद झाली.

बीजिंग - जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेची टीम चीनचा दौरा करणार आहे. जगभरात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असून अमेरिका, ब्राझील आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. जागितक स्तवरील चिंताजनक वातावरणामुळे चीनने कोरोनासंदर्भात माहिती देण्यास विलंब केला. त्यामुळेच, जगभरात मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला असून कोरोनाबाधितांची संख्या  सांगण्यात येत  कोटींच्या पुढे गेली आहे. 

चीनमधील वुहान या शहरातून कोरोना जगभर पसरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोनाचे मूळ हे चीन असून चीनमध्येच कोरोनाचा जन्म झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला तपासणीसाठी जाणार आहे. त्यासाठी चीनमधील कम्युनिष्ट सरकारने आज डब्ल्यूएचओला परवानगी दिली आहे. चीनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी याबाबतची माहिती दिली. चीनने कोरोना व्हायरसची माहिती देण्यासाठी उशीर केल्यामुळे बघता बघता संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस पसरला. डब्ल्यूएचओची टीम पुढील आठवड्यात चीनला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध अतिशय गहन पद्धतीने करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, असा अंदाज आहे. 

जगभरात कोरोनाचा फैलाव अद्यापही मोठ्या प्रमाणात होत असून गेल्या २४ तासांत भारतात २२ हजार ७५२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ७ लाख ४२ हजार ४१७ वर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून भारतात दर दिवशी कोरोनाचे २० ते २२ हजार रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी अद्यापही लस निघाली नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये लसीसंदर्भात संशोधन सुरु आहे. मात्र, अद्यापही लस शोधण्यात यश आले नाही. तुर्तास रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषध उपलब्ध झाले असून आणखी एक औषध बाजारात येत आहे. हेटरो ग्रुप व्यतिरिक्त प्रसिद्ध फार्मा कंपनी 'सिप्ला'ला रेमडेसिवीर तयार आणि विक्री करण्याची परवानगीही देण्यात आली होती. हेटरोने आपले औषध लाँच केले आहे. तसेच, आता येत्या एक-दोन दिवसात आपले औषध बाजारात आणले जाईल, असे सिप्लाने जाहीर केले आहे. 
 

Web Title: Where exactly was Corona born? WHO will go to China for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.