शेख हसीना आता कुठे जाणार? मुलाने केला मोठा खुलासा, फक्त एका निर्णयाची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 03:18 PM2024-08-08T15:18:38+5:302024-08-08T15:20:39+5:30

Bangladesh Crisis : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही तेथे जाळपोळ सुरू आहेत. दरम्यान, शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या होत्या. आता त्यांच्याबाबत मुलाने मोठा खुलासा केला.

Where will Sheikh Hasina go now? The boy made a big revelation, just waiting for a decision | शेख हसीना आता कुठे जाणार? मुलाने केला मोठा खुलासा, फक्त एका निर्णयाची प्रतिक्षा

शेख हसीना आता कुठे जाणार? मुलाने केला मोठा खुलासा, फक्त एका निर्णयाची प्रतिक्षा

Bangladesh crisis : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसापासून गोंधळ सुरू आहे. तेथील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही तेथे हिंदूंना लक्ष्य करून जाळपोळ सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.  शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्यानंतर त्या युरोपीय देशात जातील असं बोललं जात होतं. दरम्यान, आता त्यांच्या मुलाने मोठा खुलासा केला आहे. 

बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार कार्यभार स्वीकारतील. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी ही माहिती दिली आहे. सरकारमधील लोक गुरुवारी रात्री ८ वाजता शपथ घेतील.

विद्यार्थ्यांनी अशक्य ते शक्य केले; बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वक्तव्य

शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजिद जॉय यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, लोकशाही पुनर्संचयित झाल्यावर शेख हसीना बांगलादेशात परततील. पाकिस्तानची आयएसआय बांगलादेशात अशांतता भडकावत आहे.

"बांगलादेशमध्ये तात्काळ लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वक्तव्य

बांगलादेशातील शूर मुलांच्या प्रयत्नांमुळे आपला देश मुक्त झाला आहे, असे उद्गार माजी पंतप्रधान व बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा झिया यांनी बुधवारी काढले. त्यांची कारावासातून मंगळवारी सुटका करण्यात आली होती. अशक्य ते शक्य करून दाखविल्याबद्दल बांगलादेशच्या जनतेचे मी अभिनंदन करते. संताप, सूडाद्वारे नव्हे, तर शांतता, प्रेम यांच्या माध्यमातूनच बांगलादेशची पुनर्उभारणी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

२०१८ नंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी केलेल्या भाषणात खालिदा झिया यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, कारावासातून माझी सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचे मी आभार मानते. बांगलादेश भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण या गोष्टींनी वेढला गेला आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया.

Web Title: Where will Sheikh Hasina go now? The boy made a big revelation, just waiting for a decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.