जगातील सोन्याच्या साठ्यांवर बसलंय तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 02:03 PM2018-07-30T14:03:59+5:302018-07-30T14:04:31+5:30
भारत हा सोन्याचा सर्वात मोठा आयातदार आहे.
मुंबई - एकेकाळी भारतामधून सोन्याचा धूर निघत असे, लोकांकडे भरपूर सोनंनाणं असायचं असं म्हटलं जायचं. पण आज जगातील विविध देशांचा विचार केला तर सोन्याचे साठे पाश्चिमात्य देशांकडे सर्वात जास्त असल्याचे दिसून येते. चकाकणाऱ्या पिवळ्या धातून शेकडो वर्षे माणसाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. भारतीय व्यक्तींनी आजही सोनं खरेदी करण्यात कोणतीही घट झालेली नाही.
अमेरिकेत जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असून या देशामध्ये 8,133.5 टन इतका सोन्याचा साठा आहे. सोनं साठवून ठेवणारे जगातील काही देश पुढीलप्रमाणे आहेत.
जर्मनी- जर्मनीमध्ये 3,377.9 टन इतका सोन्याचा साठा आहे. अमेरिकेनंतर जर्मनीचाच नंबर लागतो. या देशाच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये सोन्याचा वाटा 67.6 टक्के इतका वाटा आहे. जर्मनीने आतापर्यंत आपले सोने इतर देशांमध्ये ठेवलेले होते आता ते जर्मनी आपल्या देशात परत घेत आहे.
फ्रान्स- फ्रान्सने आपल्या सोन्याच्या साठ्यापैकी काही सोने नुकतेच विकले आहे तरिही या देशात 2,435.8 टन इतके सोने आहे.
चीन- चीन हा सोने उत्पादनात एक महत्त्वाचा देश आहे. मात्र या देशात 1,842.6 टन इतकेच सोने आहे.
रशिया- या देशामध्ये 1,615,2 टन इतके सोने आहे.
स्वीत्झर्लंड- 1,040 टन इतके सोने या देशात आहे. देशाच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीपैकी 5.6 टक्के सोन्याचा वाटा आहे.
जपान- जपानमध्ये 765.2 टन इतके सोने आहे.
नेदरलँड्स 612.5 टन इतके सोने आहे.
भारत- सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक असणाऱ्या या देशात 557.8 टन इतक सोने आहे.