जगातील सर्वांत शांत देश कोणता? या देशाला मिळाला मान, भारताचे स्थान किती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 06:59 AM2023-06-30T06:59:52+5:302023-06-30T07:00:26+5:30

Most Peaceful Country In The World: ग्लोबल पीस इंडेक्स-२०२३ नुसार सर्वांत शांत देशांच्या यादीत युरोप आणि आशियाचे वर्चस्व आहे. तर सिंगापूर, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, जपान आणि स्वित्झर्लंड हे टॉप १० देशांच्या यादीत आहेत. 

Which is the most peaceful country in the world? This country got honor, what is the position of India? | जगातील सर्वांत शांत देश कोणता? या देशाला मिळाला मान, भारताचे स्थान किती? 

जगातील सर्वांत शांत देश कोणता? या देशाला मिळाला मान, भारताचे स्थान किती? 

googlenewsNext

 नवी दिल्ली : आइसलँडला पुन्हा एकदा जगातील सर्वांत शांत देश होण्याचा मान मिळाला आहे. २००८ पासून आइसलँडने यात अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यानंतर डेन्मार्क आणि आयर्लंडचा क्रमांक लागतो. शांत असल्याने सर्वात आनंदी देश म्हणून आइसलँड जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वर्चस्व कुणाचे? 
ग्लोबल पीस इंडेक्स-२०२३ नुसार सर्वांत शांत देशांच्या यादीत युरोप आणि आशियाचे वर्चस्व आहे. तर सिंगापूर, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, जपान आणि स्वित्झर्लंड हे टॉप १० देशांच्या यादीत आहेत. 

नेमके कसे ठरवले जाते? 
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष, सामाजिक सुरक्षा आणि सैन्यीकरण यासह २३ पॅरामीटर्सवर १६३ देशांचे मूल्यमापन केल्यानंतर हा निर्देशांक जाहीर केला जातो.

भारताचे स्थान किती? 
जगातील सर्वांत शांत देशांमध्ये भारताचे स्थान अतिशय मागे म्हणजेच १२६वे आहे. 
असे असले तरीही हिंसक गुन्ह्यांमध्ये घट, राजकीय अस्थिरता कमी होण्यासह शेजारी देशांसोबतचे संबंध सुधारल्यामुळे देशातील एकूण शांतता ३.५ टक्क्यांनी सुधारली आहे. 

शेजारी देशांची स्थिती काय? 
nनिर्देशांकात भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये भूतानला १७वे, नेपाळला ७९वे, बांगलादेशला ८८वे आणि पाकिस्तानला १४६वे स्थान मिळाले आहे. २०२२ मध्ये हिंसाचारामुळे १७.५ ट्रिलियन डॉलरचा फटका बसला होता, 
nसंघर्ष अधिक आंतरराष्ट्रीय होत आहेत. २००८ मध्ये ५८ देशांना बाह्य संघर्षाचा फटका बसला होता, आता ही संख्या ९१ इतकी वाढली आहे.  जवळपास अर्ध्या जगाला संघर्षाचा फटका बसत आहे.

७९ देशांमध्ये वाढली अशांतता
गेल्या वर्षी जगातील ८४ देशांमध्ये सुधारणा झाली, तर ७९ देशांमध्ये शांतता कमी झाली. जागतिक शांततेची सरासरी पातळी ०.४२ टक्क्यांनी घसरली आहे. युरोप हा जगातील सर्वांत शांत प्रदेश आहे. या प्रदेशात सर्वोच्च शांतताप्रिय देशांपैकी सात देश आहेत. इतर तीन सर्वांत शांत देश आशिया-पॅसिफिक प्रदेशात आहेत.

जगातील सर्वांत शांत देश कोणते? 
रँकिंग    देश 
१    आइसलँड 
२    डेन्मार्क 
३    आयर्लंड 
४    न्यूझीलंड 
५    ऑस्ट्रिया

जगातील सर्वांत अशांत देश? 
रँकिंग    देश
१५९    काँगो 
१६०    दक्षिण सुदान
१६१    सीरिया
१६२    येमेन
१६३    अफगाणिस्तान

Web Title: Which is the most peaceful country in the world? This country got honor, what is the position of India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.