कोरोनाच्या लढाईसाठी अमेरिकेनं दिलं दोन लाख कोटी डॉलरचं पॅकेज, शेअर बाजारात संचारला उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:34 PM2020-03-25T12:34:53+5:302020-03-25T12:40:02+5:30

विशेष म्हणजे अमेरिकेच्या संसदेत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातल्या शेअर्स बाजारात उत्साह संचारला आहे.

white house and senate leaders reached a deal early wednesday on a massive 2 trillion dollar corona vrd | कोरोनाच्या लढाईसाठी अमेरिकेनं दिलं दोन लाख कोटी डॉलरचं पॅकेज, शेअर बाजारात संचारला उत्साह

कोरोनाच्या लढाईसाठी अमेरिकेनं दिलं दोन लाख कोटी डॉलरचं पॅकेज, शेअर बाजारात संचारला उत्साह

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातल्या अमेरिका, रशिया या बलाढ्य देशांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं २ लाख कोटी डॉलर(जवळपास १५० लाख कोटी रुपयां)चं पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संसदेत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातल्या शेअर्स बाजारात उत्साह संचारला आहे.

वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातल्या अमेरिका, रशिया या बलाढ्य देशांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. कोरोनाचा जगभरातल्या अर्थव्यवस्थांवरही दुष्परिणाम झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं २ लाख कोटी डॉलर(जवळपास १५० लाख कोटी रुपयां)चं पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संसदेत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातल्या शेअर्स बाजारात उत्साह संचारला आहे.

भारताच्या शेअर बाजारानंही चांगलीच उसळी घेतली असून, सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तसेच कच्च्या तेलाच्याही किमती वाढल्या आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी आणि कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी अमेरिकेनं दोन लाख कोटी डॉलरचं पॅकेजची घोषणा केली आणि आशियाच्या शेअर बाजारांत उत्साह संचारलाय.

आंतरराष्ट्रीय बेंचमार्कनुसार ब्रेंट क्रूड २.९ वाढून जवळपास २८ डॉलर प्रति बॅरल किमतीवर पोहोचलं आहे. अमेरिकन बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ३.५ टक्क्यांनी वाढून २५ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचलं आहे. प्रवासाला घातलेले प्रतिबंध आणि जगभरात  करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन्ही बेंचमार्क खाली येताना दिसत होते. तसेच सौदी अरेबिया आणि रशियादरम्यान शीतयुद्ध सुरू असल्यानं तेलाच्या किमती पडल्या होत्या. अमेरिकेच्या शेअर बाजारात ८७ वर्षांनी आलेली सर्वात मोठी तेजी असून, दिलासादायक पॅकेजची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारानं जोरदार उसळी घेतली आहे. डाऊ जोन्सचा निर्देशांकही ११.४ टक्क्यांनी उसळला आहे. तसेच १९३३नंतरची ही सर्वात मोठी तेजी आहे. 
 

Web Title: white house and senate leaders reached a deal early wednesday on a massive 2 trillion dollar corona vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.