अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेला वाद पत्रकाराला पडला महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 12:32 PM2018-11-08T12:32:29+5:302018-11-08T13:10:34+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि CNN चा पत्रकार यांच्यात वाद झाला होता. जिम अकोस्टा असे या पत्रकाराचे नाव असून या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि CNN चा पत्रकार यांच्यात वाद झाला होता. जिम अकोस्टा असे या पत्रकाराचे नाव असून या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले. बुधवारी ट्रम्प आणि पत्रकारामध्ये हा वाद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अकोस्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकल्यावर ट्रम्प यांना राग आला आणि त्यांनी या पत्रकाराला बसायला सांगितले. मध्यवर्ती निवडणुकांच्या वेळी तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला? असा प्रश्न विचारल्याने ट्रम्प चिडले.
White House suspends press pass of CNN's Jim Acosta after heated confrontation between reporter and US President Donald Trump during a news conference yesterday: Associated Press. pic.twitter.com/HDpLZJGVBz
— ANI (@ANI) November 8, 2018
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही तू एक उद्धट माणूस आहेस' असं म्हणत पत्रकाराचा अपमान केला. मात्र पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी दुसरा प्रश्न विचारला. 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा त्या निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप होतो आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? असे या पत्रकाराने विचारले. दुसऱ्या प्रश्नानंतर ट्रम्प यांचा पारा चढला. या सगळ्या वादानंतर CNN या वृत्तवाहिनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.