भारतीय कफ सिरपमुळे इराकमध्ये गदारोळ; WHO ने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:55 PM2023-08-08T15:55:24+5:302023-08-08T15:55:33+5:30

डब्ल्यूएचओने इराकमध्ये विक्री होणाऱ्या भारतीय कफ सिरफबाबत अलर्ट जारी केला आहे.

who-alert-about-indian-made-cold-syrup-sold-in-iraq | भारतीय कफ सिरपमुळे इराकमध्ये गदारोळ; WHO ने जारी केला अलर्ट

भारतीय कफ सिरपमुळे इराकमध्ये गदारोळ; WHO ने जारी केला अलर्ट

googlenewsNext

काही महिन्यांपूर्वी काही देशांमध्ये भारतातील औषधांवर बंदी घालण्यात आली होती. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आता आणखी एका भारतीय कफ सिरप (पॅरासिटामॉल आणि क्लोरफेनिरामाइन) बाबत इशारा जारी केला आहे. WHOने 10 जुलै रोजी इराकमध्ये या सिरपचा नमुना घेतला होता. हा नमुना तपासात फेल ठरला. 

भारतात बनवलेल्या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण आढळून आले असून ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. बॅचमधील या सिरपमध्ये 0.25 टक्के डायथिलीन ग्लायकॉल आणि 2.1 टक्के इथिलीन ग्लायकॉल आढळल्याची माहिती आहे. 

प्रमाणापेक्षा जास्त केमिकल सापडले
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, WHO ने सोमवारी सांगितले की, हे सिरप फोरर्ट्स (इंडिया) लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडने डॅबीलाईफ फार्मा प्रायव्हेट लिमेटेडसाठी तयार केले आहे. एका सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल, या दोन्हींची निर्धारित मर्यादा 0.10 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय, उत्पादक-विक्रेत्याने उत्पादनाबाबत डब्ल्यूएचओला सुरक्षितता आणि गुणवत्तेची कोणतीही हमी दिलेली नाही.

सिरप वापरू नका, मृत्यू होऊ शकतो
हे सिरप वापरणे असुरक्षित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. त्याचा वापर एखाद्याचे आरोग्य गंभीरपणे बिघडू शकते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. सध्या या संदर्भात कंपन्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

डब्ल्यूएचओने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, हरियाणामध्ये निर्मित मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडची चार उत्पादनांची तपासणी सुरू आहे. तसेच, डिसेंबर 2022 मध्ये WHO ने यूपीमध्ये बनवल्या जाणार्‍या बायोटेक प्रायव्हेटच्या दोन उत्पादनांबाबत अलर्ट जारी केला होता. 

हजारो कारखाने सर्टिफिकेटविना सुरू 
आरोग्य मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, देशातील 10,500 फार्मास्युटिकल कारखान्यांपैकी 8,500 MSME श्रेणीत येतात. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी फक्त 2,000 कारखान्यांकडे डब्ल्यूएचओचे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) प्रमाणपत्र आहे. 6,500 औषधी कारखान्यांकडे हे प्रमाणपत्र नाही. औषधांच्या दर्जासाठी हा पुरावा असणे अत्यंत आवश्यक आहे.
 

Web Title: who-alert-about-indian-made-cold-syrup-sold-in-iraq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.