CoronaVirus News: कोरोना लसींना घाईघाईत परवानग्या देऊ नका, गंभीर परिणाम होतील; WHO चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 09:37 AM2020-09-01T09:37:42+5:302020-09-01T09:54:31+5:30
संपूर्ण चाचण्या पूर्ण न करता लसींचा वापर झाल्यास धोका वाढेल; जागतिक आरोग्य संघटनेकडून भीती व्यक्त
कोरोनावरील लसींना घाईघाईत परवानग्या दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापराच्या परवानग्या देत असल्याचं नुकतंच म्हटलं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला. कोरोना लसींचा वापर करण्यासाठी घाई करू नका, असा सल्ला संघटनेकडून देण्यात आला आहे.
परिणामकारकता आणि सुरक्षिततेबद्दल पूर्ण खात्री नसलेल्या कोरोना लसींचा वापर केल्यास त्याचे गंभीर साईड इफेक्ट दिसू शकतात. त्यामुळे कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देताना संबंधित प्राधिकरणांनी जबाबदारीनं निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं.
कोरोनास्त्र! चीनने भारतासह G7 देशांना झोपविले; GDP त स्वत: मात्र प्लसमध्ये
'तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय कोरोनावरील लसीला परवानगी द्यायची नाही, यावर सगळ्यांचं एकमत आहे. सर्व चाचण्या झाल्याशिवाय कोरोना लसीला परवानगी देणं धोकादायक ठरू शकतं. अपुऱ्या चाचण्या झालेल्या लसींचा वापर केल्यास कोरोना संकटाचा शेवट होणार नाही. उलट हे संकट आणखी गंभीर होईल. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल,' असं स्वामीनाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं.
ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या वाढणार?, अमेरिकेतील इन्स्टिट्यूटचा दावा
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त स्टिफन हान यांनी कोरोना लसीबद्दल नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. लस केवळ तिसऱ्या टप्प्यात आहे, म्हणून तिला परवानगी नाकारणार नाही, असं हान यांनी 'फायनान्शियल टाईम्स' वृत्तपत्राला सांगितलं. लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झालेला नसला, तरीही आम्ही लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊ. याबद्दलचे निर्णय वैज्ञानिक माहितीच्या आधारे घेतले जातील, असं हान यांनी म्हटलं आहे.
कोरोनावरील लस चालू वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटलं आहे. कोरोनाची लस ३ नोव्हेंबरच्या आधी बाजारात येईल, असं ट्रम्प अनेकदा म्हणाले आहे. ३ नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यामध्ये ट्रम्प उमेदवार आहेत.
LAC पार गेलेल्या जवानांना तात्काळ मागे बोलवा, चीनकडून भारतावर गंभीर आरोप
शाब्बास पठ्ठ्यांनो! पँगौंग तलावानजीक ‘Strategic Height’वर भारताचा कब्जा; चीनला जबरदस्त दणका