शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या; मुलांवर मोठ्या काळासाठी प्रभाव राहणार : WHO मुख्य वैज्ञानिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:42 AM2021-08-11T08:42:35+5:302021-08-11T08:45:31+5:30
Coronavirus School Opening : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये आहेत बंद. शाळा सुरू करण्याला प्राधान्य देण्याचं स्वामीनाथन यांचं आवाहन.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच जगभरात अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या आरोग्याकडे पाहून हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता याला दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एक ट्वीट करत शाळा सुरू करण्याला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि शिकण्याच्या क्षमतेवर मोठ्या कालावधीसाठी प्रभाव राहणार असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.
"मुलांच्या मनसिक, शारीरिक आणि शिकण्याच्या क्षमतेवर मोठ्या कालावधीसाठी प्रभाव राहिल, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सर्व मोठ्या व्यक्तींच्या लसीकरणासोबतच शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यायला हवं. एकत्र जमा होण्यावर आणि सातत्यानं हात साफ करण्यासारख्या उपयांचाही वापर करण्यात यावा," असं सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
The impact on children's mental, physical and cognitive wellbeing will last a long time. School openings must be prioritized with distancing, masking, avoiding indoor singing and gatherings, hand hygiene & vaccination of all adults @mhrdschools@DrYasminAHaque@NITIAayog@UNICEFhttps://t.co/vgWcTZ6Nnk
— Soumya Swaminathan (@doctorsoumya) August 10, 2021
नुकतीच स्वामीनाथन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली होती. त्यावेळीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी शाळा सुरू करण्याचं वक्तव्य केलं होतं. "समोर येणाऱ्या प्राधान्यक्रमाच्या गोष्टींमध्ये शाळा पुन्हा केव्हा आणि कशा सुरू कराव्या हेदेखील आहे. गरीब मुलं जर मोठ्या कालावधीपर्यंत शाळेत गेली नाही, तर याचा प्रभाव अधिक जास्त खराब असेल.ते ऑनलाइन शिक्षणाची सुविधा वापरू शकत नाहीत. जक ती मुलं शाळेत गेली नाही, तर पुन्हा ते आपलं शिक्षण सुरू करु शकणार नाही," असं त्या म्हणाल्या होत्या.