WHO Coronavirus : तब्बल ७० लाख मृत्यू; आता ‘कोरोना ही जागतिक महासाथ नाही,’ WHO ची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:05 PM2023-05-05T21:05:12+5:302023-05-05T21:05:39+5:30
जागतिक आरोग्य संघटनेनं ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलं होतं.
कोरोनाच्या महासाथीनं जगभरात थैमान घातलं होतं. घड्याळाच्या काट्यावर चालणारं जग अचानक पूर्णपणे थांबलं होतं. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक महासाथ घोषित केलं होतं. कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला. परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठी घेषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना जागतिक महासाथ म्हणून संपल्याची घोषणा केली आहे. कोरोना आता जागतिक आरोग्य आणीबाणीच्या रूपात संपल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
“संघटनेच्या आपत्कालीन समितीची १५ वी बैठक पार पडली. सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याची घोषणा केली जावी असं मला सांगण्यात आलं. मी त्यांचा सल्ला स्वीकारला आहे. म्हणूनच, आता मोठ्या आशेनं, मी जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याचं जाहीर करतो. पण याचा अर्थ कोरोना पूर्णपणे संपला असा होत नाही,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस यांनी म्हटलं.
Yesterday, the #COVID19 Emergency Committee met for the 15th time and recommended to me that I declare an end to the public health emergency of international concern. I have accepted that advice.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) May 5, 2023
With great hope I declare COVID-19 over as a global health emergency.
जागतिक आरोग्य संघटनेनं ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटनुसार कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.