डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 08:57 AM2024-09-16T08:57:04+5:302024-09-16T08:57:46+5:30

Attack On Donald Trump: अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडामधील वेस्ट पाम बिच येथील गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत असताना हा गोळीबार झाला.

Who exactly is the attacker who shot Donald Trump? Shocking information came to the fore  | डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडामधील वेस्ट पाम बिच येथील गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत असताना हा गोळीबार झाला. गोळीबारानंतर आरोपीला त्वरित अटक करण्यात आली आहे. दरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख ५८ वर्षीय रयान वेस्ले राउथ अशी पटवण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी तपासल्यावर तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. रायन वेस्ले हा सध्या हवाई प्रांतामध्ये राहतो. तसेच १९९० च्या दशकापासून आतापर्यंत पोलिसांसोबत त्याचा अनेकदा आमना सामना झालेला आहे.

राऊथ हा मूळचा कॅरोलिना येथील रहिवासी आहे. तिथे त्याला ड्रग्स बाळगणे, विना परवाना वाहन चालवणे, विना विमा वाहन चालवणे यासारख्या अनेक प्रकरणात अटक झालेली आहे.

दरम्यान, राऊथ हा डोनाल्ड ट्रम्प यांचा कट्टर विरोधक असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच तो डाव्या विचारांच्या मोहिमांना सार्वजनिकपणे पाठिंबा देत असे. त्याबरोबरच तो सोशल मीडियावर एक चांगली कामगिरी करणारा व्यक्ती म्हणून स्वत:ला प्रमोट करत असे. राऊथ हा डेमोक्रॅट पक्षाचा समर्थक असून, त्याने सोशल मीडियावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अनेक पोस्ट केलेल्या आहेत. त्याबरोबरच रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामध्ये तो युक्रेनचा समर्थक होता. तसेच रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनला मदत करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचेही त्याने एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते.  

Web Title: Who exactly is the attacker who shot Donald Trump? Shocking information came to the fore 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.