सीरियातून राष्ट्राध्यक्षांना पळवून लावणाऱ्या गटाचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:16 IST2024-12-08T15:14:50+5:302024-12-08T15:16:34+5:30
Abu Mohammad Al-Jolani syria war: सीरियात हयात तहरीर अल शाम या कट्टरपंथीय बंडखोरांच्या संघटनेने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. त्यामुळे सीरियातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत.

सीरियातून राष्ट्राध्यक्षांना पळवून लावणाऱ्या गटाचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी कोण?
Syria War hayat tahrir al-sham: हयात तहरीर अल शामने सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना जबर धक्का दिला. २४ वर्षांपासून सीरियावर राज्य करत असलेल्या असद यांचे सरकार हयात तहरीर अल शाम संघटनेच्या बंडखोरांनी उलथवून टाकले. राष्ट्राध्यक्ष असद देश सोडून पळून गेले आहेत. सीरियातील राजकीय समीकरणे बदलवणाऱ्या हयात तहरीर आणि त्याचा प्रमुख अबू मोहम्मद अल जुलानी यांच्या नावाची चर्चा होत आहे.
एचटीएएस अर्थात हयात तहरीर अल शामने राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारविरोधात बंड केले. या गृहयुद्धाचा इतका भडका उडाला की, असद यांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. ज्या संघटनेने हे केले, त्याचा प्रमुख आहे अबू मोहम्मद अल जुलानी!
अमेरिकेने जाहीर केलेले आहे एक कोटी डॉलरचे बक्षीस
एचटीएसचा प्रमुख अबू मोहम्मद अल जुलानीवर अनेक मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप केले गेले आहेत. गेल्या काही वर्षात अल जुलानीने स्वतःची प्रतिमा उदारमतवादी म्हणून तयार करण्याचेही प्रयत्न केले आहेत. त्यांच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचा बक्षीसही जाहीर केलेले आहे.
अबू मोहम्मद अल जुलानी कोण, त्याचे खरे नाव काय?
अबू मोहम्मद अल जुलानी हे एक टोपनाव आहे. त्याचे खरे नाव आणि वय याबद्दल वाद आहेत. अमेरिकेतली पीबीएसला फेब्रुवारी २०२१ मध्ये दिलेल्या मुलाखतीत अल जुलानीने काही खुलासे केले होते.
अल जुलानीच्या माहितीनुसार, त्याचे जन्मानंतरचे नाव अहमद अल शारा असे होते आणि तो सीरियाचा आहे. त्याचे कुटुंब गोलान भागात होते. अबू मोहम्मद अल जुलानीचा जन्म सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झाला होता. तिथे त्याचे वडील कामाला होते. पण, तो नंतर सीरियाची राजधानी दमास्कमध्ये लहानाचा मोठा झाला.
माहितीनुसार, अबू मोहम्मद अल जुलानी उर्फ अहमद हुसैन अल शाराचा जन्म १९८२ मध्ये रियाधमध्ये झाला होता. (इंटरपोलच्या माहितीनुसार त्याचा जन्म १९७९ मध्ये झाला होता.) १९८९ मध्ये त्याचे कुटुंब सीरियामध्ये परत आले. २००३ मध्ये इराकवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या काही काळ आधी अल जुलानी हा अल कायदा या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला.
अल जजिराच्या रिपोर्टनुसार तो अमेरिकन सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी इराकलाही गेला होता आणि अल कायदात भरती झाला. तो एक वर्ष अल कायदामध्ये होता. २००६ मध्ये अमेरिकेने जुलानीला पाच वर्षांसाठी तुरुंगात बंद केले होते.
अल जुलानीने अबू बकर अल बगदादीसोबतही केले काम
तुरुंगातून बाहेर आल्यावर अल जुलानी सीरियात आला आणि अल कायदाशी संबंधित अल नुसरा फ्रंट उघडण्याची जबाबदारी घेतली. त्या संघटनेने इदलीबसह अनेक ठिकाणी बंडखोरांना धक्का देत ताबा मिळवला होता. अल जुलानीने त्या काळात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीसोबतही काम केले आहे. २०१३ मध्ये बगदादीने अल कायदासोबतचे संबंध संपवत असल्याचे जाहीर केले. पण, अल जुलानी अल कायदासोबत काम करत राहिला.
दमिश्क पर विद्रोहियों का कब्जा, PM को ले गए साथ
— NDTV India (@ndtvindia) December 8, 2024
सीरिया के राष्ट्रपति बशर अल-असद देश छोड़कर भाग चुके हैं. सीरिया में पिछले 11 दिनों से विद्रोही गुटों और सेना के बीच कब्जे के लिए लड़ाई चल रही थी. इस बीच विद्रोही लड़ाके रविवार सुबह राजधानी दमिश्क में घुस गए और सीरियाई प्रधानमंत्री… pic.twitter.com/xsB61rgd17
२०११ मध्ये बशर अल असद यांच्याविरोधात सीरियात सशस्त्र संघर्ष सुरू झाला. त्यावेळी अल बगदादीने त्यांना तिथे शाखा सुरू करण्यासाठी पाठवले होते. २०१३ मध्ये अल जुलानीने नुसरा फ्रंटचा इसिससोबतचे संबंध तोडले. २०१७ मध्ये अल जुलानीने म्हटले होते की, त्यांच्या गटाने सीरियातील इतर बंडखोर गटांना सामील करून घेतले आणि हयात तहरीर अल शाम असे नाव संघटनेला देण्यात आले. अल जुलानी या संघटनेचा प्रमुख आहे.