डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 08:37 AM2024-09-25T08:37:32+5:302024-09-25T08:38:13+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडा गोल्फ कोर्समध्ये मारण्याचा कट रचणारा बंदूकधारी आरोपीवर मंगळवारी आरोप निश्चित करण्यात आले.

Who Is Plotting Donald Trump Assassination?; A sensational claim by the US intelligence agency | डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इराणकडून येत असलेल्या धमक्यांबाबत गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ट्रम्प यांच्या जीविताला धोका आहे असं त्यांनी सांगितले आहे. याबाबत ट्रम्प यांच्या टीमकडूनही पुष्टी मिळाली आहे.

ट्रम्प यांच्या कॅम्पेन टीमने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आज सकाळी राष्ट्रीय गुप्तचर संचालन कार्यालयाकडून   इराणच्या धमकीबाबत कळवण्यात आले. हे करण्याचा प्रयत्न करणारे संयुक्त राज्य अमेरिकेत अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला इराणकडून धोका गेल्या काही महिन्यात आणखी वाढला आहे. अमेरिकन सरकारचे अधिकारी ट्रम्प यांची सुरक्षा करणे आणि निवडणुकीवर परिणाम होण्यापासून रोखणे हे काम करत आहेत असं त्यांनी सांगितले.इराणनं याआधीही अमेरिकन प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अमेरिकेचा दावा खोडून काढला. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात इराणचे स्थायी मिशन आणि ODNI ने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.

ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न

डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडा गोल्फ कोर्समध्ये मारण्याचा कट रचणारा बंदूकधारी आरोपीवर मंगळवारी आरोप निश्चित करण्यात आले. ज्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुकीतील उमेदवाराची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय हिंसक कृत्याला चालना देणे, बंदूक बाळगणे आणि अधिकाऱ्यांवर हल्ला करणे हे गुन्हेही नोंदवले आहेत. आरोपी हा सीक्रेट सर्व्हिस एजेंट असल्याचं कोर्टात समोर आले.

आरोपी फ्लोरिडामध्ये गोल्फ कोर्सच्या बाहेर त्याची बंदूक आणि खाद्य साहित्य घेऊन जवळपास 12 तास तळ ठोकून बसला होता. तो ट्रम्प यांची वाट पाहत होता. फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवर रविवारी जेव्हा ट्रम्प गोल्फ खेळत होते तेव्हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळून आरोपीला अटक केली. पकडलेल्या आरोपीचं नाव रयान राऊथ असं आहे. 

१३ जुलै रोजी झालेला हल्ला

यापूर्वी १३ जुलै रोजी ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ही गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. पण, रॅलीत आलेल्या दोन लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी आरोपीला जागीच गोळ्या घातल्या होत्या.

Web Title: Who Is Plotting Donald Trump Assassination?; A sensational claim by the US intelligence agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.