Pakistan New Army Chief: पाकिस्तानचा नवा लष्करप्रमुख कोण? संरक्षण मंत्रालयाने पाच जणांची यादी पीएमओला दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 08:47 PM2022-11-21T20:47:13+5:302022-11-21T20:49:12+5:30

Pakistan New Army Chief Selection: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीवरून दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

Who is the new army chief of Pakistan? The Ministry of Defense gave the list of five persons to the PMO, Qamar Javed Bajwa will retire | Pakistan New Army Chief: पाकिस्तानचा नवा लष्करप्रमुख कोण? संरक्षण मंत्रालयाने पाच जणांची यादी पीएमओला दिली

Pakistan New Army Chief: पाकिस्तानचा नवा लष्करप्रमुख कोण? संरक्षण मंत्रालयाने पाच जणांची यादी पीएमओला दिली

Next

पाकिस्तानमध्ये नवीन लष्करप्रमुखावरून राजकीय वातावरण तापले आहे. पाकिस्तानी नेत्यांना भारतविरोधी सैन्यप्रमुखाऐवजी त्यांच्या तालावर नाचणारा प्रमुख हवा झाला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांसह माजी पंतप्रधान इम्रान खान देखील यात कमालीचे लक्ष घालू लागले आहेत. पाकिस्तानचे लष्करप३मुख जनरल कमर जावेद बाजवा २९ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. यामुळे पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाने सोमवारी पाच नावांची यादी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून दिली आहे. 

Next Pakistan Army Chief: अस्तनीतला साप! ज्याने लष्करप्रमुख बनवले त्यालाच घालवले; दोन पंतप्रधान बदलून बाजवा निवृत्त होणार

पाकिस्तान आर्मी ऍक्ट (PAA) 1952 अंतर्गत, संरक्षण मंत्रालयाने नवीन लष्कर प्रमुखाची नियुक्ती करण्यासाठी सध्याच्या लष्करप्रमुखांची  डिस्चार्ज समरी देणे आवश्यक आहे. जनरल बाजवा (61) तीन वर्षांच्या मुदतवाढीनंतर 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाला संरक्षण मंत्रालयाकडून सोमवारी नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात पाच जणांची नावे आहेत. त्यापैकी एकाची जनरल जावेद बाजवा यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पीएमओने संरक्षण मंत्रालयाकडून असा कोणताही अहवाल मिळाल्याची पुष्टी केलेली नाही.

सेवाज्येष्ठतेच्या क्रमानुसार लेफ्टनंट जनरल असीम मुनीर, लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा, लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास, लेफ्टनंट जनरल नौमन मेहमूद आणि लेफ्टनंट जनरल फैज हमीद हे नवीन लष्कर प्रमुखपदाच्या शर्यतीत आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीवरून दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. आपल्या समर्थकांना 26 नोव्हेंबरला रावळपिंडीत जमण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या सत्तेत परतण्यासाठी मदत करणारा लष्करप्रमुख असावा, असे इम्रान खान यांना वाटत आहे. 

Web Title: Who is the new army chief of Pakistan? The Ministry of Defense gave the list of five persons to the PMO, Qamar Javed Bajwa will retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.