काळजी वाढली! ओमायक्रॉनबाबत WHO ने व्यक्त केली चिंता, बघा भारतात किती वाढले रूग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 11:22 AM2021-12-29T11:22:18+5:302021-12-29T11:23:51+5:30

Omicron cases : कोविड-१९ च्या साप्ताहिक एपिडेमायोलॉजिकल अपडेटमध्ये WHO ने सांगितलं की, 'अनेक देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरण्यामागे नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे.

WHO says new variant of corona virus Omicron risk remains very high | काळजी वाढली! ओमायक्रॉनबाबत WHO ने व्यक्त केली चिंता, बघा भारतात किती वाढले रूग्ण?

काळजी वाढली! ओमायक्रॉनबाबत WHO ने व्यक्त केली चिंता, बघा भारतात किती वाढले रूग्ण?

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंता वाढवली आहे. WHO (World Health Organisation) ने बुधवारी सांगितलं की, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका अजूनही खूप जास्त आहे. WHO ची प्रतिक्रिया गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर कोविड-१९ च्या(Covid-19) ११ टक्के केसेस वाढल्यानंतर आली आहे. भारतात ओमायक्रॉनचे आतापर्यंत ७८१ रूग्ण सापडले आहे. 

कोविड-१९ च्या साप्ताहिक एपिडेमायोलॉजिकल अपडेटमध्ये WHO ने सांगितलं की, 'अनेक देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरण्यामागे नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे. हा त्या देशांमध्येही पुढे निघून गेला जिथे आधी डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातलं होतं'. यूएन हेल्थ एजन्सीने सांगितलं की, नवीन व्हेरिएंट ऑफ कन्सर्न ओमायक्रॉनची एकूणच रिस्क जास्त आहे.

WHO ने सांगितलं की, 'सतत समोर येत असलेल्या आकडेवारीवरून हे दिसतं की, डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन जास्त वेगाने पसरत आणि विकसित झाला आहे. ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशातही व्हायरस वेगाने पसरत आहे. या देशांमध्ये आता ओमायक्रॉन जास्त प्रभावशाली  व्हेरिएंट बनला आहे. इम्यूनमधून वाचण्याची क्षमता आणि जास् संक्रामक होण्याचं कॉम्बिनेशन ओमायक्रॉनच्या वेगाचं कारण असू शकतं'.

WHO ने हेही सांगितलं की, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या केसेस २९ टक्के कमी झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका पहिला देश आहे ज्याने २४ नोव्हेंबरला पहिल्यांदा WHO ला ओमायक्रॉन व्हेरिएंटची माहिती दिली होती. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्कमधून मिळवलेल्या सुरूवातीच्या डेटामधून समजलं की, डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन इन्फेक्शनने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका कमी आहे. 

मात्र, ओमायक्रॉनची गंभीरता समजून घेण्यासाठी अजून डेटाची गरज आहे. ज्यात ऑक्सीजनचा वापर, मेकॅनिकल व्हेंटिलेशन आणि मृत्यूच्या आकडेवारींचा समावेश आहे. कोविडने आधी संक्रमित झालेले लोक आणि वॅक्सीन घेतलेल्या लोकांसाठी ओमायक्रॉन किती गंभीर आहे. हे जाणून घेण्यासाठी डेटाची गरज आहे. 

WHO ने सांगितलं की, 'अशी आशा आहे की, कोर्टिकोस्टेरॉयड आणि इंटरल्यूकिन ६ रिसेप्टर ब्लॉकर्स गंभीर रूपाने आजारी पडत असलेल्या रूग्णांच्या उपचारात प्रभावी ठरेल. सुरूवातीचा डेटा हेही सांगतो की, मोनोक्लोन अॅंटीबॉडीज शरीरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रभाव कमी करण्यात कमी फायदेशीर ठरू शकते'.
 

Web Title: WHO says new variant of corona virus Omicron risk remains very high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.