WHO कडून भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध अलर्ट जारी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 10:23 PM2022-10-05T22:23:30+5:302022-10-05T22:23:58+5:30

WHO : रॉयटर्सने जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने सांगितले की, कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत पुढील तपास केला जात आहे.

who says probing indian cough syrup after 66 children die gambia | WHO कडून भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध अलर्ट जारी, कारण...

WHO कडून भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध अलर्ट जारी, कारण...

googlenewsNext

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्सद्वारे बनवलेल्या खोकला आणि सर्दीच्या (Cough Syrup) चार औषधांबाबत अलर्ट जारी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने संभाव्यत: या औषधाला किडनीच्या दुखापतींशी आणि गाम्बियामधील 66 मुलांच्या मृत्यूशी जोडले आहे. रॉयटर्सने जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने सांगितले की, कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत पुढील तपास केला जात आहे.

"चार उत्पादनांपैकी प्रत्येकाच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणाने पुष्टी केली की त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा आहे," असे जागतिक आरोग्य संघटनेने वैद्यकीय उत्पादनाच्या अलर्टमध्ये म्हटले आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेबरेएसस यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने आज गाम्बियामध्ये गंभीर मूत्रपिंडाच्या दुखापती आणि मुलांमधील 66 मृत्यूंशी संबंधित असलेल्या चार दूषित औषधांसाठी वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक पुढे म्हणाले की, ही चार औषधे भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे उत्पादित खोकला आणि सर्दीची आहेत. जागतिक आरोग्य संघटना भारतातील संबंधित कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसह पुढील तपास करत आहे. दूषित उत्पादने आतापर्यंत फक्त गाम्बियामध्ये आढळली आहेत. इतर देशांमध्ये सुद्धा ही वितरित करण्यात आल्याची शक्यता आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटना सर्व देशांतील रूग्णांना आणखी नुकसान टाळण्यासाठी ही उत्पादने शोधून ती हटविण्याची शिफारस करत आहे. 

Web Title: who says probing indian cough syrup after 66 children die gambia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.