अमेरिकेच्या व्हिसा अॅप्लिकेशनसाठी कुणाची मदत घ्यावी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 03:52 PM2018-02-26T15:52:59+5:302018-02-26T15:52:59+5:30
आपण स्वतःच व्हिसा अर्ज योग्यरितीने भरला आहे याची खात्री करणं सर्वात चांगला मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे जावे आणि तेथे दिलेल्या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करावी.
प्रश्न - व्हिसाची पूर्तता करण्यासाठी अमेरिकन वाणिज्य दूतावास कोणत्या प्रवासी कंपन्या, इंटरनेट कॅफे किंवा इतर सेवांचा वापर करावा असे सुचवते ?
उत्तर - व्हिसा अॅप्लिकेशनची पूर्तता करण्यासाठी अमेरिकन वाणिज्य दूतावास कोणत्याही एका विशेष प्रकारची प्रवासी एजन्सी, इंटरनेट कॅफे किंवा इतर सेवांचा वापर करावा असे सूचवत नाही. आपण स्वतःच व्हिसा अर्ज योग्यरितीने भरला आहे याची खात्री करणं सर्वात चांगला मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे जावे आणि तेथे दिलेल्या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करावी. जर अर्जदार 16 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याच्या किंवा तिच्या वतीने त्यांचे पालक किंवा पालनदार अर्ज भरू शकतील.
जर आपण व्हिसा प्रीपरेशन सेवेचा वापर करायचे निश्चित केले तर, तुम्हाला मदत करणारी व्यक्तीची ओळख अर्जात करून द्यावी लागेल आणि स्वाक्षरी करून तुमचा अर्ज साक्षांकित करावा लागेल. अर्ज तुम्ही स्वतः भरलात किंवा व्हिसा प्रीपरेशन सेवांचा लाभ घेतलात तरीही त्यातील सर्व माहिती पूर्ण योग्य असल्याची खात्री करण्याची जबाबदारी आपलीच असेल. अर्जात जागा रिकाम्या राहणे व चुका यांबद्दल तुम्हीच जबाबदार असाल. उदा- जर आपण विवाहित असूनही सिंगल असो नमूद केले किंवा भारताबाहेर कोणकोणत्या देशांना आपण भेट दिली आहे हे योग्य प्रकारे नमूद केले नसल्यास तुम्ही व्हिसा प्रीपरेशन सेवांची मदत घेतली असली तरीही तुमच्या अर्जावर परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेचा व्हिसा मिळवून देतो अशी खात्री देणा-या संस्थांची मदत घेऊ नका. व्हिसा देण्याचा निर्णय पूर्णतः वाणिज्य दूतावास अधिकारी यांच्याकडे असतो. तसेच व्हिसा प्रीपरेशन सेवांकडे व्हिसाबाबत सकारात्मक निर्णय मिळेल असा कोणताही अधिकार नसतो.