Corona Vaccine: जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही; WHO ने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 02:30 PM2021-08-19T14:30:21+5:302021-08-19T14:36:33+5:30
Corona Vaccine: जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे.
वॉशिंग्टन: कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसली असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याचे चिंता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर वाढत चालला आहे. यातच काही देशांमध्ये बुस्टर डोस देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे. (who soumya swaminathan says no need for corona vaccine booster dose for now)
“अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार
सर्वप्रथम आपल्याला जगातील गरीब देशातील लसीकरण पूर्ण करण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे. कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की, सध्या बूस्टर डोसची गरज नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, असे WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस
जगभरात सध्या मुबलक प्रमाणात लस उपलब्ध
जगभरात आताच्या घडीला मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. मात्र, चिंतेचे कारण म्हणजे लस योग्य संख्येत, योग्य ठिकाणी पोहोचत नाही. गरीब देशांमधील सर्वांचे जोपर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचारही करु नये. गरीब देशांतील नागरिकांना लसीचे दोन डोस उपलब्ध करुन देण्याच्या लक्ष्यापासून आपण अद्यापही दूर आहोत, असे WHO कडून सांगण्यात आले आहे.
TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!
दरम्यान, WHO ने दिलेल्या माहितीनुसार, जगातील उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, मे महिन्यात प्रत्येक १०० लोकांसाठी सरासरी ५० डोस उपलब्ध होते आणि त्यानंतर आतापर्यंत ही संख्या दुप्पट झाली आहे. तेच जर कमी उत्पन्न असलेल्या देशांबाबत बोलायचे झाले तर, इथे पुरवठ्याच्या कमतरतेमुळे प्रत्येक १०० लोकांपाठी लसीची मात्रा सरासरी १.५ डोस इतकी आहे. WHO च्या अधिकाऱ्यांच्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस घेतल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होईल, असेही अद्याप सिद्ध झालेले नाही. तर दुसरीकडे अमेरिकेने २० सप्टेंबरपासून देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सरकारने डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.