आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:07 PM2024-09-28T17:07:07+5:302024-09-28T17:07:46+5:30

Hassan Nasrallah : १९९२ मध्ये हसन नसराल्लाहला हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनवण्यात आले.

Who was Hassan Nasrallah, Hezbollah chief killed in Israel strike on Lebanon? know about him | आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

जेरुसलेम/बेरूत: इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसरल्ला कोण होता? तो या भयंकर दहशतवादी संघटनेचा प्रमुख कसा बनला? त्याने इस्रायलशी वैर का घेतले? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. सय्यद हसन नसरल्लाहचा जन्म ३१ ऑगस्ट १९६० रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उत्तरेकडील बुर्ज हमौद येथे झाला होता. हसन नसराल्लाहचे त्याच्या वडिलांनी अत्यंत गरिबीत पालनपोषण केले. ते एक छोटेशे दुकान चालवत होते. जेणेकरून मुलांचे संगोपन करता येईल. 

१९९२ मध्ये हसन नसराल्लाहला हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनवण्यात आले. इराणच्या पाठिंब्याने हसन नसराल्लाहने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटना अतिशय मजबूत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली होती. दरम्यान, हिजबुल्लाहचे इस्रायलशी असलेले शत्रुत्व नवीन नाही, उलट हिजबुल्लाहची स्थापनाच इस्रायलविरोधात होती.

हसन नसराल्लाह नेहमी आपलं ठिकाण बदलत होता. जेणेकरून शत्रू कधीही त्याच्यावर हल्ला करण्याची भीती होती. मात्र, यावेळी हसन नसराल्लाह इस्रायली सैन्याच्या नजरेतून स्वत:ला वाचवू शकला नाही. दरम्यान, हसन नसराल्लाहची चार मुलंही हिजबुल्लाहशी संबंधित होती. त्याचा मोठा मुलगा हिजबुल्लाह सेनानी होता आणि तो १९९७ मध्ये इस्रायली हल्ल्यात मारला गेला.

हसन नसराल्लाह हा १९७५ मध्ये लेबनॉनमधील गृहयुद्धात सक्रिय झाला होता. तो इस्रायलच्या लेबनीज भूभागाच्या विरोधात होता. तेव्हापासून त्याचे इस्रायलशी जास्त वैर निर्माण झाले होते. हसन नसराल्लाह पूर्वी शिया मिलिशिया संघटनेचा सदस्य होता. नंतर हिजबुल्लाहमध्ये सामील झाला. १९९२ मध्ये हिजबुल्ला प्रमुख सय्यद अब्बास मुसावीची हत्या झाली. त्यानंतर हसन नसराल्लाह हा हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनला. 

लेबनॉनमध्ये २०१८ च्या संसदीय निवडणुकीतही हिजबुल्लाहला मोठा विजय मिळाला होता. त्यामुळे लेबनॉनच्या राजकीय विभागात हसन नसराल्लाहचा चांगला प्रभाव होता. त्याने दावा केला होती की, लेबनॉनमध्ये १ लाखांहून अधिक हिजबुल्लाह सैनिकांची फौज तयार करण्यात आली आहे. दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने केलेल्या पलटवारामुळे हसन नसराल्लाह  संतापला होता. गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या भीषण हल्ल्याविरुद्ध तो १ वर्षापासून इस्रायलविरोधात लढत होता. मात्र, हसन नसराल्लाहने गेल्या आठवडाभरापासून इस्रायलशी थेट युद्धात उडी घेतली होती. 

Web Title: Who was Hassan Nasrallah, Hezbollah chief killed in Israel strike on Lebanon? know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.