कोण होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? ज्योतिषी महिलेनं केली मोठी भविष्यवाणी; बायडेन यांच्या संदर्भातही अचूक भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 01:25 PM2024-07-28T13:25:03+5:302024-07-28T13:27:59+5:30

एक्सवर त्यांची प्रोफाइल स्टारहील नावाने आहे. त्यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण पणे खऱ्या सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Who will be the next United States president The astrologer woman amy tripp made a big prediction Accurate predictions regarding Biden as well | कोण होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? ज्योतिषी महिलेनं केली मोठी भविष्यवाणी; बायडेन यांच्या संदर्भातही अचूक भाकीत

कोण होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? ज्योतिषी महिलेनं केली मोठी भविष्यवाणी; बायडेन यांच्या संदर्भातही अचूक भाकीत

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक आता चांगलीच रंगात येत आहे. यातच, ज्योतिषांचे अंदाजही येऊ लागले आहेत. ॲमी ट्रिप नावाच्या ज्योतिषी महिलेने अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती कोण असेल? यासंदर्भात भाकीत वर्तवले आहे. यापूर्वी त्यांनी ज्यो बायडेन यांच्यासंदर्भात अचूक भविष्यवाणी केली होती. एमी ट्रिपने आपल्या 'एक्स' हँडलवरील बायोमध्ये स्वतःला इंटरनेटवरील सर्वात कुख्यात ज्योतिषी असल्याचे म्हटले आहे.

एक्सवर त्यांची प्रोफाइल स्टारहील नावाने आहे. त्यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण पणे खऱ्या सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आता या ज्योतीषी महिलेने, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प बाजी मारतील, असे म्हटले आहे. यासाठी त्यांनी काही ज्योतिषीय गणनांचा हवाला दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की ट्रम्प यांचा यूरेनस मिड हेवनमध्ये आहे. हा त्यांचे करियर आणि गोल्ससंदर्भात अनिश्चितता दर्शवतो. यांनी यापूर्वीही ज्यो बायडेन यांच्यासंदर्भात अचूक भविष्यवाणी केली  होती. ज्यो बायडेन हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून बाजूला होतील, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर असेच घडले. तेव्हापासूनच एमी ग्रिप सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे, बायडेन बाजूला झाल्यानंतर, कमला हॅरिस या राष्ट्रपती बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे असतील, असे भाकितही त्यांनी वर्तवले होते.

एमी ग्रिप यांनी ज्यो बायडेन यांच्या प्रकृतीसंदर्भातही काही दावे केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ज्यो बायडेन यांना आगामी काळात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही समस्या जाणवतील. त्यांची प्रकृती अधिक खालावेल. याशिवाय, अमेरिकेला ऑगस्ट महिन्यांत आणखी ससम्यांचा सामना करावा लागेल. या काळात येथे राजकीय अस्थिरता दिसून येईल. महत्वाचे म्हणजे, नुकत्याच आलेल्या सर्व्हेमध्ये कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील अंतर कमी होताना दिसत असल्याचे म्हटले जत आहे.

Web Title: Who will be the next United States president The astrologer woman amy tripp made a big prediction Accurate predictions regarding Biden as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.