व्हॉटस्अ‍ॅपचे वापरकर्ते एक अब्ज

By admin | Published: February 3, 2016 02:58 AM2016-02-03T02:58:02+5:302016-02-03T02:58:02+5:30

मोबाईल मॅसेजिंग व्हॉटस्अ‍ॅपने गेल्या पाच महिन्यांत १० कोटी वापरकर्ते (युझर्स) जोडून घेऊन जागतिक स्तरावर एक अब्ज युजर्सचा टप्पा ओलांडला आहे.

Whotswap users have a billion | व्हॉटस्अ‍ॅपचे वापरकर्ते एक अब्ज

व्हॉटस्अ‍ॅपचे वापरकर्ते एक अब्ज

Next

न्यूयॉर्क : मोबाईल मॅसेजिंग व्हॉटस्अ‍ॅपने गेल्या पाच महिन्यांत १० कोटी वापरकर्ते (युझर्स) जोडून घेऊन जागतिक स्तरावर एक अब्ज युजर्सचा टप्पा ओलांडला आहे.
व्हॉटस्अ‍ॅपने ब्लॉगपोस्टवर म्हटले आहे की, आजच्या तारखेत एक अब्ज लोक व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करीत आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक सात व्यक्तींतील एक जण आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी दरमहा व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करीत आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये व्हॉटस्अ‍ॅपचा फेसबुकद्वारे १९ अब्ज डॉलरमध्ये ताबा घेण्यात आला आहे.
फेसबुकवरील एका पोस्टमध्ये सह संस्थापक जॉन कोऊम यांनी म्हटले आहे की, या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक दिवशी ४२ अब्ज संदेश, १.६ अब्ज फोटो आणि २५ कोटी व्हिडिओज पाठविले जातात.

Web Title: Whotswap users have a billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.