मरणार्यांत पुरुष जास्त का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:43 PM2020-03-28T15:43:28+5:302020-03-28T15:44:56+5:30
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांत स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त का आहे? एखाद्याला कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला ते पुन्हा होईल का? कधी? केव्हा?
आपल्यालाही कोरोना झाला तर? कोरोनाबाधित रुग्णाच्या आपण संपर्कात आलो तर? नेमकं कशापासून, कोणापासून किती दूर राहायचं?. कोरोनामुळे अनेकांच्या डोक्यात अनेक प्रo्नांनी थैमान घातलं आहे.
कोरोनावर काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं. यासारख्या गोष्टींनी आपल्याला दिलासा देण्याचा प्रय} सारेच जण करीत असले तरी, कोरोनाच्या या राक्षसानं संशोधकांचीही मती सध्या गुंग केली आहे. सर्वसामान्यांपेक्षा त्यांचे प्रo्न वेगळे असले, तरी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनावर लस शोधण्याचे प्रय} युद्धपातळीवर सुरू आहेत, त्याला अजून काही कालावधी लागेल, पण अनेक प्रo्नांचा गुंतवळा शास्त्रज्ञांच्याही मनात ठाण मांडून बसला आहे.
काय आहेत हे प्रo्न?
1- कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांत स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त का आहे?
2- एखाद्याला कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला ते पुन्हा होईल का? कधी? केव्हा?
3- ‘कोविड-19’ची साथ नेमकी कशामुळे पसरतेय? काही कारणं कळलीत, पण ती तेवढीच नाहीत. आणखी कारणं कोणती?
4- कोरोनाची लागण आणखीही अनेकांना झाली असण्याची शक्यता आहे, कारण त्यांची तपासणीच झालेली नाही. सुक्ष्म लागण झाल्याचे स्पष्टपणे कळतही नाही. हा व्हायरस नेमका आहे कुठे आणि आणखी किती लोकांना त्याची लागण होणार आहे?
5- कोरोनाचा मृत्युदर आज एक टक्क्यापासून तीन टक्क्यांपर्यंत सांगितला जातोय, पण प्रत्येक ठिकाणी तो बदलतोय. हा मृत्युदर नेमका असेल तरी किती?
6- उष्ण आणि दमट वातावरणात अनेक विषाणू जास्त काळ जगू शकत नाहीत. पण प्रत्येक विषाणूबाबत हे खरं नाही. शिवाय काही विषाणू सिझनल, काही विशिष्ट कालावधीतच फैलावतात. कोरोना नेमका कसा आहे?
7- मुलांना आणि त्यांच्यापासून इतरांना खरंच किती प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होतो? मुलांनाही संसर्ग झाल्याचं दिसलंय, पण ते खूप मोठय़ा प्रमाणात आजारी पडल्याचंही फारसं दिसलं नाही. ते का?
8- काही ठराविक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होतोय. पण त्यात सगळ्याच वयाच्या व्यक्ती आहेत. नेमका कोणाला जास्त धोका आहे आणि त्याची कारणं काय?
9- हा व्हायरस नेमका कुठून आला? त्याची सुरुवात कशी झाली? त्याचा नायनाट कधी होईल? कसा? कालांतरानं तो ठराविक ठिकाणांसाठी र्मयादित राहील का? कशामुळे?.
कोरोनाबाबत सर्वसामान्यांना जेवढे प्रo्न पडले आहेत, त्यापेक्षाही जास्त प्रo्न संशोधकांसमोर आज आहेत.
एलिझा बर्कले, रासमुसीन, उमर इरफान, मॉरिसिओ सॅँटिलाना, नाथन गृबाघ, मैमुना मजुमदर, अकिको इवासाकी, ज्युलिआ बेलुज. यांसारखे जगभरातले अनेक शास्त्रज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांना हे प्रo्न पडले आहेत. सध्या तरी ते अनुत्तरीत आहेत, पण सगळे मिळून या प्रo्नांना ते भिडले आहेत.