चीनमध्ये अनेक लोक गायब का होत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:44 AM2023-07-31T09:44:14+5:302023-07-31T09:45:03+5:30

आतापर्यंत चीनमधून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती गायब झाल्या आहेत, त्यांच्यावर एक नजर...

Why are so many people disappearing in China? | चीनमध्ये अनेक लोक गायब का होत आहेत?

चीनमध्ये अनेक लोक गायब का होत आहेत?

googlenewsNext

चीनमध्ये गायब झालेल्या हाय-प्रोफाइल लोकांच्या यादीत देशाचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँगही सहभागी झाले आहेत. किन २५ जूनपासून बेपत्ता आहेत. ते गायब असल्याने आता त्यांच्या जागी वांग यी यांची पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत चीनमधून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती गायब झाल्या आहेत, त्यांच्यावर एक नजर...

टीव्ही अँकरसोबत अफेअर? 
५७ वर्षीय किन हे अमेरिकेमध्ये राजदूतही होते. डिसेंबरमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. अमेरिकेचे राजदूत आणि नंतर परराष्ट्रमंत्री त्यांची पदोन्नती ही राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कृपा मानली जाते. आता ही कृपा थांबल्याचे दिसून येत आहे. टीव्ही अँकरसोबतच्या अफेअरमुळे ते गायब झाल्याचाही अंदाज बांधला जात आहे.

चीन काय म्हणतो? 
केवळ २०७ दिवस परराष्ट्रमंत्री असलेल्या किन यांच्या बेपत्ता आणि हकालपट्टीबद्दल चीनकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत काहीही पारदर्शक असे नाही. मतभेदाबद्दल काही बोलायचे नसते आणि प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत.

कोण-कधी झाले गायब? 
नोव्हेंबर २०२१ 
टेनिसपटू पेंग शुईने कम्युनिस्ट पक्षाच्या झांग गाओलीवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर अनेक महिने ती गायब झाली होती.

जून २०२१ 
सुरक्षा उपमंत्री डोंग जिंगवेई काही महिन्यांसाठी बेपत्ता झाले. त्याच्याकडे कोरोना का पसरला याची सिक्रेट होती, अशी अफवा पसरली होती.

ऑक्टोबर २०२० 
अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांनी चीनच्या आर्थिक नियमांवर टीका केल्यानंतर अनेक महिने गायब झाले होते.

जुलै २०१८ 
करचुकवेगिरीत अडकलेली लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग गायब झाली.

२०१२ 
चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग काही आठवडे गायब झाल्यानंतर अचानक चीनचे सर्वोच्च नेते म्हणून उदयास आले.
 

Web Title: Why are so many people disappearing in China?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.