दोन मिनिटांमध्ये समजून घ्या, तुर्कस्थानचे चलन का घसरले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:48 AM2018-08-15T11:48:13+5:302018-08-15T12:00:36+5:30
अमेरिकेने निर्बंध लादल्यास अमेरिकेन इलेक्ट्रोनिक वस्तूंवर बंदी घालू अशी धमकी तुर्कस्थानने घातली आहे.
अंकारा- भारताचा रुपया गेल्या काही दिवसांमध्ये सतत घसरत आहे. मंगळवारी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्य़े 70.7वर दाऊन पोहोचला होता. याप्रमाणेच जगभरातील इतर देशांचे चलनही कमी अधिकप्रमाणात घसरले आहे. सर्वात मोठा फटका तुर्कस्थानच्या लिरा या चलनाला बसलेला आहे. तुर्कस्थानच्या उदाहरणावरुन सर्व देशांनी आताच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात लिराचा दर 50 टक्क्यांनी घसरला आहे.
लिराचा दर का घसरला? हे जाणून घेण्यासाठी पुढील मुद्द्यांचा विचार करता येईल.
1) तुर्कस्थानातील राजकीय आणि आर्थिक प्रश्नांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून त्यामुळे चलनवाढ झाली आहे. तुर्कस्थानच्या तिजोरीतील परदेशी चलनाचा साठाही कमी होत चालला आहे.
2) जुलै महिन्यामध्ये तुर्कस्थानात चलनवाढीचा दर 16 टक्क्यांवर पोहोचला असून परदेशी कर्जांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे वित्तिय तूटही वाढल्यामुळे अर्थव्यवस्था अधिकाधिक नाजूक होत चालली आहे.
3) तुर्कस्थानामध्ये अमेरिकन ख्रिश्चन धर्मगुरु आणि , नासाचे वैज्ञानिक आणि अमेरिकन वाणिज्यदुतावासात काम करणारे काही तुर्की नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. या लोकांनी तुर्कस्थानात झालेल्या लष्करी बंडाला मदत केल्याचा आरोप केला आहे. मात्र अमेरिकन नागरिकांना तात्काळ सोडावे यासाठी अमेरिकेने वारंवार मागणी केली आहे. या लोकांना सोडण्यासाठी करण्यात येणारा करार अंतिम टप्प्यात आला असतानाच बोलणी फिस्कटली. त्यावर अमेरिकेने तुर्कस्थानावर निर्बंध लादण्याचे जाहीर केले. यामुळे तुर्कस्थानचे चलन अधिकच घसरले.
4) तुर्कस्थानामध्ये मध्यवर्ती बँकेतील कामकाजात सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होतो. मध्यवर्ती बँकेवर अध्यक्ष म्हणून तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या अर्थमंत्र्यांच्या जावयाला नेमले आहे. त्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
5) तुर्कस्थानने स्पॅनिश बँकांकडून 83.3 अब्ज डॉलर, फ्रेंच बँकांकडून 38.4 अब्ज डॉलर, इटालियन बँकांकडून 17 अब्ज डॉलर, जपानच्या बँकांकडून 14 अब्ज डॉलर, ब्रिटिश बँकांकडून 19.2 आणि अमेरिकेकडून 18 अब्ज डॉलरचे कर्ज घेतलेले आहे.
A ban on iPhones?! Erdogan announces boycott on US products#Erdogan#Turkey#iPhonepic.twitter.com/NmwXoIBXoH
— Ruptly (@Ruptly) August 14, 2018
भारतीय रुपयाची स्थिती कशी आहे?
भारतीय रुपया सुद्धा सलग काही दिवस घसरत चालला असून 2018मध्ये त्याची डॉलरच्या तुलनेमध्ये 9 टक्के इतकी घसरण झालेली आहे. 63. 67 पासून 70.7 अशी रुपयाची घसरण होत गेली. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे रुपयावर परिणाम झाला. त्याचप्रमाणे लिराचा दर घसरल्यामुळे जगातील अनेक बाजारांवर परिणाम झाला असून रुपयावरही त्याचा परिणाम झाला.
The Turkish Lira continues to fall despite #Erdogan's attempt to point the blame on the #USA. Watch the latest video on the #Lira, #gold & #dollar - https://t.co/LVWTYUDJShpic.twitter.com/oPTnYIE02C
— RethinkingtheDollar (@RethinkinDollar) August 15, 2018