मानवाचे आयुष्य कमी का होतेय, शास्त्रज्ञाने कारण सांगितले; त्याला नोकरीवरूनच काढले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 05:18 PM2024-02-06T17:18:20+5:302024-02-06T17:18:46+5:30

आनुवंशिकशास्त्रज्ञ अलेक्झांडर कुद्र्यावत्सेव्ह या असे या संशोधकाचे नाव होते. ते रशियन जनरल जेनेटिक्सच्या संस्थेचे संचालक होते. जून २०२१ मध्ये त्यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

Why human life is getting shorter, the scientist told the reason; He was fired... | मानवाचे आयुष्य कमी का होतेय, शास्त्रज्ञाने कारण सांगितले; त्याला नोकरीवरूनच काढले...

मानवाचे आयुष्य कमी का होतेय, शास्त्रज्ञाने कारण सांगितले; त्याला नोकरीवरूनच काढले...

रशियाच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाने एका सायन्टिस्टला नोकरीवरून काढून टाकले आहे. त्याने आपल्या संशोधनाच्या आधारे मनुष्याचे आयुष्य कमी कमी कसे होत गेले यावर मोठा दावा केला होता. यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

आनुवंशिकशास्त्रज्ञ अलेक्झांडर कुद्र्यावत्सेव्ह या असे या संशोधकाचे नाव होते. ते रशियन जनरल जेनेटिक्सच्या संस्थेचे संचालक होते. जून २०२१ मध्ये त्यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या 'गॉड-मॅन-वर्ल्ड' या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आणि धार्मिक परिषदेदरम्यान त्यांनी आयुष्य कमी होण्यावरून वादग्रस्त विधाने केली होती. बायबलपूर्वी मानव 900 वर्षांपर्यंत जगत होता, असा दावा त्यांनी केला होता. परंतु त्यांच्या पूर्वजांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या पापांमुळे लोकांचे आयुष्य कमी झाल्याचा दावा केला होता. पापांचा मानवी जीनोमवर परिणाम होतो, असेही ते म्हणाले होते. 

नास्तिक असलेले शास्त्रज्ञ जरी आयुष्य कमी होण्याला प्रदुषण, किरणोत्सर्ग किंवा अन्य कारणे देत असतील तरी ते पापामुळे होते असे माझे मत आहे. माझा विश्वास आहे की असा विनाश पापाने सुरू होतो, पूर्वजांच्या पापाने वाढतो आणि वैयक्तिक पापाने देखील होतो. यामुळे तुम्ही पाप केले तर त्याचे परिणाम पुढील सात पिढ्यांपर्यंत होतात, असा इशाराही या शास्त्रज्ञाने परिषदेतील श्रोत्यांना दिला होता.
 

Web Title: Why human life is getting shorter, the scientist told the reason; He was fired...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :russiaरशिया