चीन का साधतोय सौदी अरेबियाशी जवळीक?; मोठ्या खुलाशामुळे अमेरिकेची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 11:00 PM2023-06-12T23:00:42+5:302023-06-12T23:01:04+5:30

सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील संबंधातील मजबुतीमुळे अमेरिका अस्वस्थ आहे.

Why is China getting closer to Saudi Arabia?; America's concern increased | चीन का साधतोय सौदी अरेबियाशी जवळीक?; मोठ्या खुलाशामुळे अमेरिकेची झोप उडाली

चीन का साधतोय सौदी अरेबियाशी जवळीक?; मोठ्या खुलाशामुळे अमेरिकेची झोप उडाली

googlenewsNext

रियाध - सौदी अरेबिया आणि चीनमधील मजबूत होत असलेल्या संबंधांमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. दोन्ही देश वेगाने द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात गुंतले आहेत. सौदी अरेबिया स्टेट व्हिजन २०३० ला पुढे नेत असताना दुसरीकडे चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) विस्तार होत चालला आहे. २०१६ मध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन २०३० लाँन्च केले होते. क्राउन प्रिन्स सलमानला पुढे जाण्यासाठी चीनचा बीआरआय सोबत घ्यायचा आहे. शिवाय, जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे चीन आणि सौदी अरेबियाला एका व्यासपीठावर येण्यास मदत झाली आहे. गेल्या दशकभरापासून अमेरिकेचं समर्थन करणाऱ्या सौदी अरेबियाला आता अपेक्षित हेतू साधता येत नाही. अशा परिस्थितीत चीनला संधी मिळाली आणि त्याने अमेरिकेची जागा स्वतःहून घेतली. सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील संबंधातील मजबुतीमुळे अमेरिका अस्वस्थ आहे.

सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० मध्ये पर्यटन हा सर्वात मोठा फोकस आहे. २०१९ मध्ये पर्यटकांचा सोर्स म्हणून चीन जगात पहिल्या क्रमांकावर होता. चिनी लोकांनी १५५ मिलियन परदेश दौरे केले आहेत आणि चीनी लोकांनी बाहेर सुट्ट्यांवर २५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केले आहेत. कोविड महामारीमुळे ही संख्या नंतर २०२० आणि २०२१ मध्ये २० आणि २६ मिलियनवर आली. अशा परिस्थितीत चीनमधून अधिकाधिक पर्यटकांना आपल्या देशात आकर्षित करण्याचा सौदी अरेबियाचा प्रयत्न आहे. हे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा सौदी अरेबियाचे चीनसोबतचे संबंध अतिशय मजबूत असतील. सौदी अरेबियात अमेरिकेचं वर्चस्व राहिला असता तर चीनशी मैत्री वाढवण्यात अडचणी आल्या असत्या. यामुळेच सौदीने अमेरिकेची सुटका करून चीनचा हात धरला.

पर्यटनातून कमवायचाय पैसा
सौदी अरेबिया दशकाच्या अखेरीस पर्यटनातून वार्षिक ४६ अब्ज डॉलर कमावण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत चिनी पर्यटक या कामात सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात, असे आखाती देशातील सर्वात शक्तिशाली देशाला वाटते. २०१९ मध्ये, सौदी अरेबियाने पर्यटनाद्वारे विक्रमी १९.८५ अब्ज डॉलर्स कमावले, त्यानंतर सौदी अरेबियाच्या पर्यटन महसूलात COVID महामारीमुळे लक्षणीय घट झाली. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया तेल उत्पादक देश असल्याच्या शिक्क्यापासून मुक्त होण्यासाठी पुन्हा एकदा पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.

चीनलाही सौदीकडून फायद्याची अपेक्षा
झिरो कोविड धोरणामुळे चीनही आर्थिक धक्क्यातून सावरत आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबियासारख्या मोठ्या आणि बलाढ्य देशाच्या पाठिंब्याची गरज आहे. मुस्लिम देशांमध्ये सौदी अरेबियाचा प्रभाव खूप जास्त आहे. मुस्लिमांवरील अत्याचारावरून चीनला आधीच टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबियाचा पाठिंबा मिळाल्याने त्याला मोठा दिलासा मिळू शकतो. दुसरीकडे, चीन आपल्या उर्जेच्या गरजेचा मोठा सोर्स सौदी अरेबियाकडून मिळवतो. अलीकडे यात रशियाचा सहभाग खूप वाढला आहे, पण भविष्यात सौदी अरेबिया तेल आणि वायू पुरवठ्याचा सर्वात मोठा सोर्स असेल. त्यामुळेच दोन्ही देशांचे संबंध वेगाने घट्ट होत आहेत.
 

Web Title: Why is China getting closer to Saudi Arabia?; America's concern increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.