इस्रायलमध्ये का काढले जात आहे मृत सैनिकांचे स्पर्म? कारण जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:22 AM2024-08-22T11:22:23+5:302024-08-22T11:24:03+5:30
Israel News: गाझा युद्धामुळे इस्रायलमधील नागरिक आणि सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून त्यांच्या मृतदेहातून स्पर्म काढण्याचा ट्रेंडही वाढताना दिसत आहे.
गाझा युद्धामुळेइस्रायलमधील नागरिक आणि सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून त्यांच्या मृतदेहातून स्पर्म काढण्याचा ट्रेंडही वाढताना दिसत आहे. सध्या इस्रायलमध्ये मृतदेहाचे स्पर्म काढण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर नियम नाही. पण, आता असे करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने देशात चर्चा सुरू झाली आहे आणि खासदार मंडळी यासंदर्भात कायदा करण्याचा विचार करत आहेत.
बीबीसीच्या वृत्तानुसार, गेली काही महिने इस्रायलसाठी अत्यंत वेदनादायी होते. 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या युद्धात सुमारे 1600 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. या 1600 पैकी 170 सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे स्पर्म सुरक्षित करण्यात आले आहेत. हा आकडा तब्बल 15 टक्के एढा आहे. गेल्या वर्षात ही संख्या केवळ 1 टक्का एवढी होती.
अशी आहे मृतदेहातून स्पर्म काढण्याची प्रक्रिया -
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू नंतर 72 तासांच्या आत ही सर्जरी करावी लागते. या प्रक्रियेत टेस्टिकल्सला कट मारून टिशूच्या माध्यमाने लॅबमध्ये पाठविले जाते. यानंतर, कुटुंबाला हे स्पर्म वापरण्याची परवानगी जोवर मिळत नाही, तोवर ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले जाते.
यापूर्वी, एखादे कुटुंब जेव्हा विनंती करत होते, तेव्हाच ही प्रक्रिया केली जात होते. न्यायालयाची परवानगीही मिळत होते. मात्र आता कायद्याचे बंधन नाही. यामुळेच येथे स्पर्म घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
यासंदर्भात विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. महत्वाचे म्हणजे, मृत व्यक्तीला मूल हवे होते, हे कुटुंबियांना सिद्ध करावे लागेल. त्यानंतरच त्याचे स्पर्म काढण्याची परवानगी दिली जाईल, अशी एक तरतूद या विधेयकात आहे. तसेच, सैनिकांकडून आधीच लेखी संहमती घेण्याची तरतूद करावी, अशी ज्यू धर्मगुरूंची इच्छा आहे.