CoronaVirus News : 'या' शहरात फक्त कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही केलं लॉकडाऊन; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 09:55 PM2021-05-28T21:55:16+5:302021-05-28T22:05:03+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. इतक्या कमी प्रमाणात रुग्ण असतानाही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

why melbourne lockdown imposed after only 26 covid positive cases over 5 million population know all | CoronaVirus News : 'या' शहरात फक्त कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही केलं लॉकडाऊन; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

CoronaVirus News : 'या' शहरात फक्त कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही केलं लॉकडाऊन; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

Next

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दुसरे राज्य व्हिक्टोरियातील मेलबर्नमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मेलबर्न शहरात फक्त 26 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. इतक्या कमी प्रमाणात रुग्ण असतानाही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

मेलबर्नच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल क्वारंटाईन दरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इतकंच नव्हे तर कोरोनाबाधितांमध्ये अधिक संसर्गजन्य असणाऱ्या बी1617 हा व्हेरिएंट आढळला आहे. त्याशिवाय व्हिक्टोरिया राज्यात कोरोना लसीकरणाचा वेगही कमी आहे. व्हिक्टोरिया राज्याचे कार्यवाहक स्टेट प्रीमियर जेम्स मर्लिनो यांनी आम्हाला व्हायरसचा अधिक वेगाने संसर्ग करणाऱ्या व्हेरिएंटचे आव्हान आहे. यामुळे आमची चिंता वाढली आहे. परदेशातून ऑस्ट्रेलियात परतलेल्या प्रवाशामुळे या व्हेरिएंट प्रसार झाल्याचं म्हटलं आहे. 

लॉकडाऊनच्या आदेशानंतर गुरुवार रात्रीपासून मेलबर्नमधील शाळा, पब आणि रेस्टोरंट्स बंद करण्यात आले. लोकांना एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर न्यूझीलंडने व्हिक्टोरियाहून येणाऱ्या विमानावर बंदी घातली आहे. व्हिक्टोरियाच्या प्रीमियरने राज्यात धीम्या गतीने होत असलेल्या लसीकरणासाठी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारला जबाबदार ठरवले आहे. अधिक संख्येने लोकांना कोरोनाची लस दिली असती तर आज वेगळी परिस्थिती असती. मेलबर्नमध्ये चौथ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! कोरोनाचा नवा साईड इफेक्ट; आकार वाढून तोंडाबाहेर लटकतेय रुग्णाची जीभ

कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णाच्या शरीरात काही साईड इफेक्ट्स हे पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता जीभेला सूज येत असल्याचं समोर आलं आहे. फ्लोरिडा येथे राहणाऱ्या अँथोनी यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांनी कोरोनावर मात देखील केली पण त्यानंतरही त्यांच्या जीभेला सूज आली. ती सूज एवढी वाढली की जीभ बाहेर लटकायला लागली. जीभेला सूज येण्याच्या समस्येला Macroglossia असं म्हणतात. यामध्ये जीभेला सूज येते आणि तिचा आकार देखील वाढू लागतो. कोरोनावर रिसर्च करणारे डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे याच्या 9 केसेस आल्याचं म्हटलं आहे. डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथोनी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारानंतर त्याची जीभ इतकी सुजली की त्याला खाणं-पिणं आणि बोलणंही शक्य होत नाही. तसेच ती बाहेर आली आहे. ड़ॉक्टरांनी सर्जरी करून ती नॉर्मल साईज एवढी केली आहे. 

Web Title: why melbourne lockdown imposed after only 26 covid positive cases over 5 million population know all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.