रात्रीच का करीत नाही स्मार्टफोन चार्ज?
By admin | Published: August 27, 2016 06:02 AM2016-08-27T06:02:12+5:302016-08-27T06:02:12+5:30
: रात्री, झोपण्यापूर्वीच तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगसाठी का ठेवत नाही? कदाचित फोन जास्त गरम होण्याची भीती वाटते का?
न्यूयॉर्क : रात्री, झोपण्यापूर्वीच तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगसाठी का ठेवत नाही? कदाचित फोन जास्त गरम होण्याची भीती वाटते का? बॅटरी खराब होण्याचा धोका वाटतो का? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातील तज्ज्ञांनीच आता दिली आहेत. त्यामुळे रात्री स्मार्टफोन चार्जिंग करताना आता कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. स्मार्टफोन हे खऱ्या अर्थाने स्मार्ट आहेत. चार्जिंग होताना कुठे थांबायचे ्रफोनला कळते.35 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानच बॅटरीला नुकसान पोहोचवू शकते, अशी माहिती अॅपल कंपनीच्या वेबसाईटवर आहे.
>कारण काय?
स्मार्टफोन रात्रीच चार्ज केला, तर सकाळी बॅटरी फुल्ल राहते; पण रात्री फोन चार्ज करावा की नाही, याबाबत साशंकता आहे.
स्मार्टफोन दोन वर्षांपेक्षा अधिक चालणार नाही, असे गृहीत धरूनच अनेक जण हा फोन वापरत असतात. त्यामुळे बॅटरीत काही समस्या निर्माण झाली, तर त्याकडे दुर्लक्ष करून नव्या फोनबाबत उत्कंठा सुरू होते.
>फोन गरम होण्याची भीती अधिक
रात्री फोन चार्ज न करण्याचे अनेक जणांचे हेच कारण आहे की, फोनला काही नुकसान होऊ नये. फोन अधिक गरम होण्याची शक्यता त्यांना वाटते.
>फोनमध्ये लिथियम
बॅटरी असते. बॅटरीमध्ये ओव्हरचार्जिंगचा धोका नसतो. आयफोन आणि अॅण्ड्राईड फोनमध्ये एक चिप बसविलेली असते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नसते.
- इदो कॅम्पोस,
अँकर कंपनीचे प्रवक्ते
>बहुतांश स्मार्टफोन कंपन्या हे नव्या बॅटरी वापरतात. ज्यात असे तंत्रज्ञान असते की, चार्जिंगची प्रक्रिया ही जलदगतीने होते. हे तंत्रज्ञान असे आहे की, चार्जर ज्या प्रमाणात विजेचा पुरवठा करते त्या प्रमाणात फोन चार्जिंग अॅडजेस्ट करून घेतो. - हतेम झेईन, ओसिया कंपनी