व्हेनेझुएलावर आक्रमण का करु नये? डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकाऱ्यांना विचारला होता प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 01:28 PM2018-07-05T13:28:55+5:302018-07-05T13:34:20+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रश्नवजा सूचनेमुळे बैठकीतील सर्वच अधिकारी अवाक झाले होते.

Why not invade Venezuela, Donald Trump asked top aides last year | व्हेनेझुएलावर आक्रमण का करु नये? डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकाऱ्यांना विचारला होता प्रश्न

व्हेनेझुएलावर आक्रमण का करु नये? डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकाऱ्यांना विचारला होता प्रश्न

वॉशिंग्टन- दक्षिण अमेरिका खंडातील अमेरिकेचा जुना वैरी व्हेनेझुएलावर आपण आक्रमण का करु नये असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकाऱ्यांना विचारला होता. याबाबत धक्कादायक माहिती उघड झाली असून अमेरिकेच्या युद्धखोर स्वभावावर जगभरातून टीका होत आहे.



समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या व्हेनेझुएला आणि भांडवलशाही स्वीकारणाऱ्या अमेरिका यांच्यामध्ये नेहमीच तंटे होत आले आहेत. तेलाच्या बळावर ह्युगो चावेज यांनी अर्थव्यवस्था बळकट केल्यामुळे अमेरिकेला डावलून त्यांना आपला देश उभा करता आला. गेल्या ऑगस्ट महिन्यात व्हेनेझुएलावर लादायच्या निर्बंधावर चर्चा झाल्यानंतर ओव्हल ऑफिसयेथील बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी, व्हेनेझुएला हा संपूर्ण प्रदेशाला धोका पोहोचवत आहे, अमेरिकेने या देशावर आक्रमण का करू नये असा प्रश्न आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रश्नवजा सूचनेमुळे बैठकीतील सर्वच अधिकारी अवाक झाले होते. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टर यांचाही या बैठकीत समावेश होता. व्हेनेझुएलाचा सगळा डोलारा ह्युगो चावेज यांच्यानंतर एकाधिकारशहा बनलेल्या निकोलस मडुरो यांच्यावर आहे. निकोलस मडुरो यांना शिक्षा करण्याच्या नादात अमेरिकेने लष्करी कारवाईचे पाऊल उचलले तर हे सगळे आपल्यावर उलटू शकते. त्याचप्रमाणे लॅटीन अमेरिकेतील इतर देशांमधील सरकारे आपल्यावर नाराज होतील असे मॅकमास्टर यांनी ट्रम्प यांना समजावले. एका अधिकाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती उघड केली आहे. इतके समजावल्यावरही ट्रम्प यांचे समाधान झाले नाही. यापुर्वी पनामा आणि ग्रेनाडावर कारवाई केल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं.

Web Title: Why not invade Venezuela, Donald Trump asked top aides last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.