हनीमूनवर गेलं होतं कपल, तेव्हाच जमिनीखाली झाला बॉम्बस्फोट आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 04:54 PM2021-10-18T16:54:02+5:302021-10-18T16:59:34+5:30

‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, बर्कशायरच्या ब्रॅक्नेलमध्ये राहणारी लिडिया मकारचुक आपला पती नॉर्बर्ट वर्गासोबत गेल्या महिन्यात हनीमूनला यूक्रेनला गेली होती.

Wife 31 injured brother friend killed honeymoon bloodbath WW1 bomb Ukraine | हनीमूनवर गेलं होतं कपल, तेव्हाच जमिनीखाली झाला बॉम्बस्फोट आणि मग....

हनीमूनवर गेलं होतं कपल, तेव्हाच जमिनीखाली झाला बॉम्बस्फोट आणि मग....

Next

ब्रिटनमध्ये राहणारं एक कपल हनीमूनसाठी यूक्रेनला गेलं होतं. पण हे कपल आता हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. या कपलसोबत काही नातेवाईक आणि मित्रही होते. सगळेच रात्रीच्या वेळ बॉनफायर करत पार्टी करत होते. तेव्हाच जमिनीत मोठा धमाका झाला. हा धमाका पहिल्या महायुद्धावेळी पुरण्यात आलेल्या काही बॉम्बमुळे झाला होता. यात नवी नवरी गंभीरपणे जखमी झाली आहे.

‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, बर्कशायरच्या ब्रॅक्नेलमध्ये राहणारी लिडिया मकारचुक आपला पती नॉर्बर्ट वर्गासोबत गेल्या महिन्यात हनीमूनला यूक्रेनला गेली होती. त्यांनी हंगेरीच्या सीमेजवळ कार्पेथियन पर्वातावर आपला मुक्काम ठोकला. रात्रीच्या वेळी सगळेच आग पेटवून गप्पा मारत बसले होते. लिडिया सांगत होतं की, कशाप्रकारे नॉर्बर्टने तिच्या शूजचं कौतुक केलं आणि दोघे कसे एकमेकांच्या जवळ येत गेले.

बोलता बोलता नॉर्बर्ट वर्गा आपला कॅमेरा आणण्यासाठी टेंटकडे गेले. जसा तो परत येण्यासाठी वळला एक जोरदार धमाका झाला. तो लगेच धावत पत्नी लिडियाजवळ पोहोचला. ती गंभीरपणे जखमी झाली होती. या बॉम्बस्फोटात लिडियाचा भाऊ आणि एका मैत्रिणीचा मृत्यू झाला. तर तिला हात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या.

लिडिया म्हणाली की, 'सगळं काही ठीक सुरू होतं. तेव्हाच एक जोरदार धमाका झाला. काही टोकदार वस्तू माझ्या चेहऱ्यावर येऊन लागल्या. मला ऐकायला येणं बंद झालं होतं. मी वेदनेने विव्हळत होते. जेव्हा धूर कमी झाला तेव्हा दिसलं की, केवळ मीच नाही तर इतरांचीही हीच अवस्था झाली आहे. मला नंतर सांगण्यात आलं की, माझा भाऊ यात वाचू शकला नाही'.

असं सांगितलं जात आहे की, कपलने जी आग पेटवली होती. त्याच्या उष्णतेमुळे जमिनीखाली दबलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, बॉम्ब ब्रुसिलोन आक्रमणावेळचा होता. तो रशिया द्वारे १९१६ मध्ये ऑस्ट्रिया-हंगरी विरोधात चालवण्यात आलेल्या एका अभियानाचा भाग होता.
 

Web Title: Wife 31 injured brother friend killed honeymoon bloodbath WW1 bomb Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.