पत्नीला वाटलं पती मित्रांसोबत एन्जॉय करतोय, सत्य समजलं तेव्हा बसला तिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 05:52 PM2022-04-01T17:52:05+5:302022-04-01T17:53:35+5:30

New Zealand : महिलेला आता पतीवर संशय घेण्याचा पश्चाताप होतोय. महिलेने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर खुलासा केला.

Wife felt husband enjoying but he was dead ignoring messages woman shocked | पत्नीला वाटलं पती मित्रांसोबत एन्जॉय करतोय, सत्य समजलं तेव्हा बसला तिला धक्का

पत्नीला वाटलं पती मित्रांसोबत एन्जॉय करतोय, सत्य समजलं तेव्हा बसला तिला धक्का

googlenewsNext

New Zealand :  एका महिलेने आपल्या पतीला एकापाठी एक अनेक मेसेज केला. पण तिला एकाही मेसेजचा रिप्लाय न आल्याने ती नाराज झाली. पण जेव्हा मेसेज न येण्याचं सत्य समोर आलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलेला आता पतीवर संशय घेण्याचा पश्चाताप होतोय. महिलेने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर खुलासा केला.

न्यूझीलॅंडला राहणाऱ्या बॉनी काल्डवेलने सांगितलं की, तिचा पती मॅट मित्रांसोबत रग्बी मॅच बघण्यासाठी गेला होता. बॉनी या गोष्टीने रागावली होती की, तिचा पती तिला सोडून मित्रांसोबत गेला. रात्री दोघांचं बोलणं झालं. पण त्यानंतर जेव्हा बॉनीने मॅटला मेसेज केला तर त्याचं उत्तर आलं नाही. त्यामुळे ती आणखीनच संतापली.

'द मिरर' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बॉनीने दुसऱ्या दिवशीही पतीला मेसेज पाठवला. पण तरीही त्याचा काही रिप्लाय आला नाही. तिला वाटलं की, पती दारू प्यायला असेल आणि त्याला तिची काही काळजी नाही. पण सत्य हे होतं की, तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.

पतीच्या मृत्यूबाबत तिला तेव्हा समजलं जेव्हा मॅटच्या भावाचा तिला फोन आला. त्याने सांगितलं की, मॅटचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून बॉनीच्या पायाखालची जमीनच सरकली. मॅट आणि त्याचे मित्र डोंगराळ भागात एका हॉटेलमध्ये थांबले होते. मॅट दारूच्या नशेत डोंगराहून खाली दरीत पडला होता.

दरम्यान, सोशल मीडियावर ज्या नॉर्मल पद्धतीने तिने पतीच्या मृत्यूबाबतची बातमी दिली लोकांना हे जर विचित्र वाटलं. तर काही लोक म्हणाले की, महिला फार मजबूत आहे. ती हे इतकं मोठं दु:खं सहन करत आहे.
 

Web Title: Wife felt husband enjoying but he was dead ignoring messages woman shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.