चॅनल प्रमुखाला भेट म्हणून दिली पत्नी
By admin | Published: June 21, 2014 12:23 PM2014-06-21T12:23:32+5:302014-06-21T14:49:07+5:30
दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनच्या कार्यकारी प्रमुखाला भेट म्हणून एक तरुणी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Next
ऑनलाइन टीम
कॅपटाऊन, दि. २१- दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनच्या कार्यकारी प्रमुखाला भेट म्हणून एक तरुणी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संतप्तप्रकाराविरोधात दक्षिण आफ्रिकेतील महिला संघटनांनी आवाज उठवला असून दक्षिण आफ्रिकेतील लैंगिक समानता आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनचे कार्यकारी प्रुख हलाउदी मोत्सोएनेंग यांना लिंपोपो प्रांतातील वेंदा या आदिवासी समुहाने भेट म्हणून एक तरुणी दिली आहे. १० तरुणींना रांगेत उभे करुन त्यापैकी एका तरुणीची निवड करण्यास मोत्सोएनंग यांना सांगण्यात आले होते. यात मोत्सोएनंग यांनी २२ वर्षीय तरुणीची निवड केली. यानंतर संबंधित तरुणी मोत्सोएनंग यांना देण्यात आली. या गटाने मोत्सोएनंग यांना तरुणीसोबत एक गायही देण्यात आली आहे. आफ्रिकेच्या एका वृत्तपत्राने मोत्सोएनंग यांचे तरुणीसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याने हे गंभीर बाब समोर आली आहे. महिलांचा भेट म्हणून वापर करणे ही आफ्रिकेच्या लोकशाही पद्धतीला लाजीरवाणी गोष्ट असून स्त्री- पुरुष समानतेला भेद देणारी ही परंपरा आहे असे आफ्रिकेच्या महिला संघटनांनी म्हटले आहे.